scorecardresearch

घटस्फोटानंतर ‘या’ अभिनेत्याने केले १६ वर्षांनी लहान असलेल्या अभिनेत्रीशी लग्न

त्यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत.

karthik kumar, amrutha srinivasan,
त्यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत.

दाक्षिणात्य अभिनेता आणि कॉमेडियन कार्तिक कुमारच्या लव्ह स्टोरीने सगळ्यांचे लक्ष वेधले आहे. कार्तिकने वयाने १६ वर्षे लहान असलेल्या अमृता श्रीनिवासनशी लग्न केले आहे. या दोघांनी जवळचे मित्र आणि कुटुंबीयांच्या उपस्थितीत लग्न केले. त्याच्या लग्नाचे काही फोटो अमृताने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

अमृताने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हे फोटो शेअर केले आहेत. या फोटोत अमृता आणि कार्तिकच्या गळ्यात वरमाला दिसत आहे. तर त्या शिवाय अमृताने तिच्या श्वानासोबत असलेला कार्तिकचा फोटो शेअर केला आहे. अमृताने शेअर केलेले हे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत.

आणखी वाचा : ‘काय विचित्र प्रकार आहे…’, व्हिडीओत पॅन्टचं बटन बंद केल्यामुळे उर्फी जावेद ट्रोल

कार्तिक आणि अमृता हे दोघेही डिजीटल क्रिएटर आहेत. त्या दोघांना अनेक सेलिब्रिटींनी लग्नाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्यापैकी एक डिजिटल क्रिएटर श्रद्धा आहे. श्रद्धाने त्यांचे काही फोटो शेअर केले आहेत. हे फोटो शेअर करत “दोन व्यक्ती जे दयाळू आणि प्रेमळ आहेत त्यांच लग्न झालं आहे. त्यांनी अत्यंत साधारण पद्धतीने लग्न केले आणि नंतर मित्रांसाठी आणि कुटुंबासाठी एका मैफिलीचे आयोजन केले. मला माहित नाही की मी कोणासाठी जास्त आनंदी आहे, तुम्ही दोघे की तुमच्या आजूबाजूच्या जगासाठी”, असे कॅप्शन श्रद्धाने दिले आहे.

आणखी वाचा : “हिला कसला एवढा अॅटिट्यूड…”, जान्हवीचा व्हिडीओ पाहून नेटकरी संतापले

दरम्यान, अमृता आधी कार्तिकने आर जे सुचित्राशी लग्न केले होते. आरजे सुचित्रा ही तामिळाडुतील लोकप्रिय सेलिब्रिटी आहे. सुचित्रा आणि कार्तिक २०१७ मध्ये विभक्त झाले.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: South divorced star karthik kumar marries 16 years younger amrutha srinivasan photos went viral dcp

ताज्या बातम्या