Premium

“माझा घटस्फोट…” ‘ऊ अंटावा’ आयटम साँगबद्दल समांथाचा मोठा खुलासा; म्हणाली “माझ्या कुटुंबाने…”

‘पुष्पा’ चित्रपटातील या गाण्याची चर्चा मोठया प्रमाणावर झाली होती

samantha 7
फोटो सौजन्य : लोकसत्ता ग्राफिक टीम

समांथा लवकरच ‘शकुंतलम’ या चित्रपटात झळकणार आहे. १४ एप्रिल रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार असून सध्या ती या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये खूप बिझी आहे. या चित्रपटाच्या घोषणेपासूनच सर्वांचं लक्ष या बिग बजेट चित्रपटाकडे लागलं होतं. या चित्रपटाच्या टिझर आणि ट्रेलरला देखील प्रेक्षकांनी खूप चांगला प्रतिसाद दिला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘ऊ अंटावा’ या आयटम साँगमधून समांथाने प्रेक्षकांच्या काळजाचा ठोका चुकवला होता. या गाण्याला आणि या गाण्यातील तिच्या नृत्याला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतलं. या गाण्यामुळे तिला नवी ओळख मिळाली. मात्र हे गाणे करण्यासाठी तिच्या कुटुंबाकडून, मित्र मैत्रिणीकडून परवानगी नव्हती. मिसमालिनीशी बोलताना ती असं म्हणाली, “मला जेव्हा ”ऊ अंटावा’साठी विचारण्यात आले तेव्हा मी घटस्फोट घेण्याच्या प्रक्रियेदरम्यान होते. जेव्हा घटस्फोटाच्या घोषणा करण्याची वेळी आली तेव्हा माझे जवळचे नातेवाईक, मित्रमंडळी, माझे सख्खे मला सांगत होते तू घरात बस, आयटम सॉंग करू नकोस. तू त्यांना नकार दे. माझे मित्र दुसरीकडे मला ‘सुपर डिलक्स’ चित्रपट करण्यासाठी पाठिंबा देत होते. ते मला सांगत होते आयटम सॉंग करू नको मात्र मी त्यांना सांगितले मी गाणे करणार.” अशी प्रतिक्रिया तिने दिली.

‘दसरा’ स्टार नानीला पडली बॉलिवूडच्या ‘या’ अभिनेत्रीची भुरळ; म्हणाला…

या गाण्यात तिच्याबरोबर अल्लू अर्जुनदेखील थिरकला आहे. समांथा ही दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींच्या यादीत येते. तर ‘पुष्पा’ नंतर तिने तिच्या मानधनांमध्ये आणखीनच वाढ केली आहे.

दरम्यान समांथाचा ‘शाकुंतलम’ हा चित्रपट ऐतिहासिक असणार आहे. तसेच ती ‘सिटाडेल’ या वेबसीरिजमध्येदेखील झळकणार आहे. प्रसिद्ध दिग्दर्शक जोडी राज आणि डीके हे या वेबसीरिजचे दिग्दर्शन करणार आहेत. तिने या वेबसीरिजच्या चित्रीकरणाला सुरवात केली आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: South indian actress samantha ruth prabhu confessed that her family and friends told her not do oo antava song spg