South Indian Bold Movies list : दाक्षिणात्य चित्रपटांची कथा, मांडणी आणि कलाकार प्रेक्षकांची मनं जिंकण्याची कोणतीच कसर सोडत नाहीत. रोमँटिक, कॉमेडी, थ्रिलर, हॉरर सर्व प्रकारचे चित्रपट दाक्षिणात्य इंडस्ट्रीत बनतात आणि प्रेक्षकही या कलाकृतींनी भरभरून प्रतिसाद देतात. हल्ली तर थ्रिलर चित्रपटांची प्रचंड क्रेझ आहे.
दाक्षिणात्य इंडस्ट्रीत थ्रिलर, हॉरर या धाटणीचे अनेक चित्रपट आतापर्यंत बनले आहेत. त्यामुळे जर तुम्ही अशा स्वरूपाचे चित्रपट पाहणं पसंत करत असाल, तर आम्ही तुम्हाला अशा काही चित्रपटांची नावं सांगणार आहोत. ते चित्रपट पाहून तुम्ही थक्क व्हाल. परंतु, हे चित्रपट कौटुंबिक चित्रपट नाहीयेत. धाडसी कथानक आणि मांडणीमुळे हे दाक्षिणात्य चित्रपट चर्चेत राहिले आहेत. यामध्ये बॉलीवूड अभिनेत्री जिनिलीया देशमुखच्या ‘बॉईज’ या चित्रपटाचाही समावेश आहे. तर यामध्ये लकोप्रिय दाक्षिणात्य अभिनेते विजय सेतुपती आणि अभिनेत्री समांथा रुथ प्रभू यांच्या चित्रपटाचाही या यादीत समावेश आहे. बोल्ड कथानकामुळे चर्चेत असलेल्या या चित्रपटांबद्दल जाणून घेऊयात…
‘हे’ चित्रपट कुटुंबाबरोबर पाहू नका
Iratta – रोहित क्रिशन्न दिग्दर्शित जोजू गौर्ज यांची मुख्य भूमिका असलेला हा एक बोल्ड थ्रिलर चित्रपट आहे. त्यामध्ये क्राइमही पाहायला मिळतं, जे तरुणांनी पाहण्यायोग्य नाहीये. त्यामुळे हा चित्रपट प्रौढ प्रेक्षकांच्या पाहण्यासाठी आहे.
tillu Square – सिद्धू जोनालगड्डा यांची मुख्य भूमिका असलेला हा एक रोमँटिक-कॉमेडी चित्रपट आहे. त्यामध्ये काही अडल्ट सीन्स आहेत. हा चित्रपट विशिष्ट वर्गासाठी आहे. कुटुंबाबरोबर हा चित्रपट पाहता येत नाही.
Boys – सिद्धार्थ आणि जिनिलीया देशमुख यांच्या मुख्य भूमिका असलेला हा चित्रपट मैत्री, प्रेम आणि तारुण्यावर आधारित आहे. हा एक तमीळ चित्रपट आहे. धाडसी कथानक आणि मांडणीमुळे हा चित्रपटही चर्चेत राहिला आहे.
RX 100- आंध्र प्रदेश येथील खेडेगावातील ही एक प्रेमकहाणी आहे. या चित्रपटातील ट्वीस्टसाठी हा सिनेमा ओळखला जातो. त्यातील इंटेन्स सीन्स कुटुंबाबरोबर पाहण्यासाठी योग्य समजले जात नाहीत.
Super Deluxe – विजय सेतुपती, राम्या क्रिशन्न, समांथा यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका असलेला हा एक डार्क कॉमेडी चित्रपट आहे. चित्रपटाची स्टोरी टेलिंग आणि बोल्ड थीम्स चित्रपटाला वेगळं आणि केवळ प्रौढ प्रेक्षकांना पाहण्यासाठी आहे.
