महेश बाबू करणार बॉलिवूडमध्ये पदार्पण?

यावर स्वत: महेश बाबूने उत्तर दिले आहे.

south megastar mahesh babu, mahesh babu, mahesh babu bollywood debut,

दाक्षिणात्य सुपरस्टार म्हणून अभिनेता महेश बाबू ओळखला जातो. जगभरात त्याचे चाहते आहेत. महेश बाबूचा प्रत्येक चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई करतो. आता एस एस राजामौली यांनी महेश बाबूसोबत चित्रपट करणार असल्याची घोषणा केली आहे. त्यामुळे चाहत्यांमध्ये चित्रपटाबाबत उत्सुकता पाहायला मिळते. अनेकदा महेश बाबू बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्याच्या देखील चर्चा सुरु असतात. आता एका मुलाखतीमध्ये महेश बाबूने यावर वक्तव्य केले आहे.

महेश बाबूला नुकत्याच फॉर्ब्सला दिलेल्या एका मुलाखतीमध्ये बॉलिवूड पदार्पणावर प्रश्न विचारण्यात आला होता. तेव्हा तो म्हणाला, ‘मी नेहमीच योग्य वेळी योग्य चित्रपट करण्याचा प्रयत्न करतो. जर राजामौली यांचा हा हिंदी चित्रपट असता आणि मला जाणवले असते की ही योग्य वेळ आहे तर मी चित्रपट साइन केला असता. माझा आगामी चित्रपट एस एस राजमौली यांच्यासोबत आहे आणि हा चित्रपट अनेक भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.’

प्रभास, धनुष आणि विजय देवरकोंडा हे दाक्षिणात्य सुपरस्टार लवकरच बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम करताना दिसणार आहेत. त्यामुळे आता मेहश बाबू बॉलिवूडमध्ये कधी दिसणार हे पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: South megastar mahesh babu made a big statement about bollywood avb

Next Story
प्रत्यक्षाहुनी उत्कट : सण-उत्सवांची ‘व्हर्च्युअल’ प्रतिमा!
ताज्या बातम्या