चित्रपटसृष्टीत असे अनेक कलाकार आहेत ज्यांनी अगदी छोट्या भूमिकांपासून सुरूवात केली आणि आज ते यशाच्या शिखरावर आहेत. अशा कलाकारांपैकी एक नाव म्हणजे विनोदवीर ब्रह्मानंदम. विनोदी अभिनय शैलीने जेव्हा ते पडद्यावर झळकतात, तेव्हा सिनेमागृहातील प्रेक्षक टाळ्यांच्या गजराने त्यांचं स्वागत करतात.

तेलगू दिग्दर्शक जन्ध्याला यांनी ब्रह्मानंदम यांना ‘मोद्दाबाई’ नावाच्या नाटकात अभिनय करताना पहिल्यांदा पाहिलं होतं. नाटकातील त्यांच्या अभिनयाने जन्ध्याला इतके प्रभावित झाले की त्यांनी ‘चन्ताबाबाई’ नावाच्या सिनेमात ब्रह्मानंदम यांना एक छोटी भूमिका साकारण्यास दिली. त्यानंतर त्यांनी पुन्हा कधी मागे वळून पाहिलं नाही आणि आज ब्रह्मानंदन जवळपास ३२० कोटींच्या संपत्तीचे मालक आहेत. आपल्या ३१ वर्षांच्या कारकिर्दीत एक हजारहून अधिक सिनेमे केल्याचा वर्ल्ड रेकॉर्डसुद्धा त्यांच्या नावावर आहे. त्यामुळे केवळ आर्थिकदृष्ट्या नाही तर सिनेमांच्या बाबतीतही ते तितकेच श्रीमंत आहेत असं म्हणायला हरकत नाही.

वाचा : …आणि मौनी सलमानच्या जास्तच जवळ गेली

ब्रह्मानंदम यांच्याजवळ Audi R8, Audi Q7, मर्सिडीज बेंज आणि इनोव्हासारख्या महागड्या गाड्या आहेत. याशिवाय कोट्यवधी रुपयांची शेतजमीनही त्यांच्या नावावर आहे. त्याचबरोबर ब्रह्मानंदम यांचा हैदराबादमधील उच्चभ्रू वसाहत जुबली हिल्स येथे एक आलिशान बंगलासुद्धा आहे. प्रसिद्धीच्या अत्युच्च शिखरावर असलेले ब्रह्मानंदम आपल्या सिनेमांसाठी जास्त फी आकारणार हे साहजिकच. एका सिनेमासाठी ते जवळपास १ कोटी रुपये चार्ज करतात.