नृत्यदिग्दर्शक जानी मास्टरने अलीकडेच त्याचा वाढदिवस साजरा केला. वाढदिवसाच्या निमित्ताने चिरंजीवी, राम चरण आणि उपासना यांच्याबरोबर काही खास क्षण जानीने त्याच्या सोशल मीडियावर शेअर केले. अभिनेता राम चरण आणि उपासना यांनी त्याच्या वाढदिवशी त्याला अनोखी भेट दिली आणि यामुळे असंख्य कुटुंबांना मदत झाली. याबद्दल जानी मास्टरने त्यांचे आभार मानले आहेत.

जानीने त्याच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर राम चरण आणि चीरंजीवीचा फोटो शेअर केला आणि कॅप्शन लिहिलं, “माझ्या वाढदिवसानिमित्त माझ्या सर्वात आवडत्या लोकांचे म्हणजेच चिरंजीवी आणि रामचरण यांचे मला आशीर्वाद मिळाल्याने मला अत्यंत आनंद होत आहे. माझ्यावरील अतूट प्रेम आणि पाठिंब्याबद्दल मी तुमचा सदैव कृतज्ञ आहे. धन्यवाद.”

हेही वाचा… “तरस नहीं आया…”, पुष्कर जोगने ‘या’ अभिनेत्रीसह केला भन्नाट डान्स, व्हिडीओ व्हायरल

जानीने राम आणि उपासनाबरोबरचा एक फोटो शेअर केला आहे. ज्यात त्याने त्यांच्याकडे जी मदत मागितली ती त्यांनी कशी दिली याबद्दल सांगितलंय. जानीने या फोटोला कॅप्शन देत तेलुगूमध्ये लिहिलं, ​​“आमच्या ‘डान्सर्स युनियन’च्या संदर्भात मी राम आणि उपासनाजवळ मदतीसाठी पोहोचलो, त्यावेळंची वेळ मला स्पष्टपणे आठवतेय. पाचशेहून अधिक कुटुंबांसाठी आरोग्य विमा प्रदान करण्याचे दिलेले वचन त्यांनी पूर्ण केले. शब्दांप्रती एवढी बांधिलकी असणं आणि विशेषत: प्रत्येक कुटुंबापर्यंत पोहोचणं ही दुर्मिळ गोष्ट आहे. परंतु त्यांनी ते केलं. दयाळूपणाचे हे कृत्य कायमचे मनावर कोरले जाईल.”

“जो वेळेवर मदत करतो तो देव मानलं जातं” असंही जानीने लिहिलं.

हेही वाचा… अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या संगीत सोहळ्यासाठी जस्टिन बीबरची भारतात एन्ट्री, जगप्रसिद्ध गायक घेणार ‘इतक्या’ कोटींचं मानधन!

जानी याने अनेक तेलुगू, तमिळ आणि हिंदीमधील अनेक हिट गाण्यांसाठी कोरिओग्राफी केली आहे. जसं की ‘जेलरम’धील “कावालया”, ‘किसी का भाई किसी की जान’ मधील “येंतम्मा”, बीस्टमधील “अरबी कुथू”, “पुष्पा: द राइज” मधील श्रीवल्ली आणि बर्याच गाण्यांची कोरिओग्राफी जानी मास्टरने केली आहे.

हेही वाचा… हिना खानने केस कापताच अभिनेत्रीच्या आईचे अश्रू अनावर, कर्करोगाचं निदान होताच घेतला मोठा निर्णय; म्हणाली, “मला हा मानसिक त्रास…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, राम चरण शेवटचा एसएस राजामौली यांच्या ‘आरआरआर’मध्ये दिसला होता, ज्यात ज्युनियर एनटीआर, आलिया भट्ट आणि अजय देवगण यांच्याही मुख्य भूमिका होत्या. २०२२ मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला प्रचंड यश मिळालं. राम चरण लवकरच ‘गेम चेंजर’मध्ये दिसणार आहे. या चित्रपटात कियारा अडवाणीदेखील झळकणार आहे.