scorecardresearch

Premium

आजाराबद्दल कळताच चिरंजीवींनी समांथाला पाठवला खास निरोप; म्हणाले, “परिस्थितीशी झुंजणारी…”

समांथाने सोशल मीडियावर रुग्णालयातील फोटो शेअर करत याची माहिती दिली होती.

chiranjeevi samantha
chiranjeevi samantha

प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्री समांथा रुथ प्रभूने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून चाहत्याना तिच्या आजाराची माहिती दिली आहे. मागच्या काही महिन्यांपासून समांथा गंभीर आजाराशी झुंजत आहे. समांथाने तिच्या सोशल मीडियावर रुग्णालयातील फोटो शेअर करत याची माहिती दिली आहे. समांथाची पोस्ट पाहिल्यानंतर तिचे चाहते हैराण झाले आहेत.

समांथाने तिच्या इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टच्या कॅप्शनमध्ये तिने लिहिलं, “‘यशोदा’ ट्रेलरला तुम्ही खूप प्रेम दिलं. हेच प्रेम आणि कनेक्शन मी तुमच्या सर्वांशी शेअर करते. तुमचं सर्वांच प्रेमच मला आयुष्यात येणाऱ्या सर्व संकटांवर मात करण्याचं बळ देतं. काही महिन्यांपूर्वीच मला मायोसायटिस नावाच्या एका ऑटोइम्यून आजाराचं निदान झालं आहे.” समांथाच्या या पोस्टनंतर तिचे चाहते सगळे चिंतेत आहेत. प्रत्येक जण तिला तब्येतीची काळजी घेण्यासाठी विनंती करत आहे.

shahid-kapoor-shahrukh
शाहरुखशी सतत होणाऱ्या तुलनेबद्दल अखेर शाहिद कपूरने सोडलं मौन; म्हणाला, “हे मूर्खपणाचं…”
father gifts dirty water bottle to daughter as birthday gift know why it is special photo viral
मुलीच्या वाढदिवसानिमित्त वडिलांनी गिफ्ट दिली अस्वच्छ पाण्याची बाटली! कारण जाणून तुम्हीही व्हाल चकित; पाहा Photo
Gautami Patil
“तू लग्न कधी करणार?” अखेर गौतमी पाटीलने दिलं उत्तर, नवऱ्याबद्दलच्या अपेक्षा सांगताना म्हणाली…
Onkar Bhojane Ankita Walawalkar
“ओंकार भोजने आणि तुझं नातं काय?” कोकण हार्टेड गर्ल म्हणाली, “आम्ही एकमेकांचे…”

आणखी वाचा : आमिर खानची आई मुंबईच्या रुग्णालयात दाखल; डॉक्टर म्हणाले…

अशातच दाक्षिणात्य अभिनेता चिरंजीवी यांनीदेखील समांथाला एक पत्र लिहून तीचं मनोबल वाढवलं आहे. ही पोस्ट ट्विटरवर शेअर करत चिरंजीवी लिहितात, “प्रिय सॅम, आपल्या आयुष्यात वेळोवेळी असे कठीण प्रसंग येत असतात. तू परिस्थितीशी झुंजणारी मुलगी आहेस, मला खात्री आहे ती या कठीण काळातूनही बाहेर येशील, त्यासाठी परमेश्वर तुला शक्ति देवो हीच प्रार्थना.” चिरंजीवी यांच्या या पोस्टला शेअर कर समांथानेही त्यांचे आभार मानले आहेत.

चिरंजीवी यांचा नुकताच ‘गॉडफादर’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आणि त्याला लोकांनी उत्तम प्रतिसाद दिला आहे. समांथा गेले काही दिवस या आजाराशी झुंज देत आहे. तिच्या ‘यशोदा’ या चित्रपटाचा ट्रेलर नुकताचा प्रदर्शित झाला असून तिचे चाहते तिला या नव्या भूमिकेत बघण्यासाठी उत्सुक आहेत.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: South superstar chiranjeevi writes on twitter to samantha after myositis dignosis avn

First published on: 30-10-2022 at 21:10 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×