scorecardresearch

चित्रपटविश्वाचं समीकरण बदलणारा ‘पुष्पक’ झाला ३५ वर्षांचा; कमल हासन यांचं दिग्दर्शकासाठी भावूक ट्वीट

पुष्पकला उत्कृष्ट चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कारदेखील मिळाला

चित्रपटविश्वाचं समीकरण बदलणारा ‘पुष्पक’ झाला ३५ वर्षांचा; कमल हासन यांचं दिग्दर्शकासाठी भावूक ट्वीट
'पुष्पक' कमल हासन यांचा चित्रपट

दाक्षिणात्य सुपरस्टार कमल हासन यांच्या प्रत्येक चित्रपटातून काहीतरी संदेश हमखास दिला जातो. त्यांचे कित्येक चित्रपट आजही पाहताना प्रेक्षक भावूक होतात. अशाच त्यांच्या प्रचंड गाजलेल्या ‘पुष्पक’ या चित्रपटाने आजच ३५ वर्षं पूर्ण केली आहेत. संपूर्ण चित्रपटात एकही संवाद नसलेल्या या चित्रपटाने त्या काळातील बेरोजगारी आणि इमानदारीवर केलेलं भाष्य हे आजही लोकांच्या चांगलंच स्मरणात आहे.

कमल हासन यांच्या कारकीर्दीतील हा चित्रपट अत्यंत महत्त्वाचा आहे. या चित्रपटाच्या पठडीने चित्रपटविश्वातील समीकरणच बदललं. कर्नाटक राज्यात हा चित्रपट ‘पुष्पक विमान’ या नावाने प्रदर्शित झाला तर उत्तरेकंदील राज्यात ‘पुष्पक’ या नावाने तो लोकप्रिय झाला. कमल हासनबरोबरच अभिनेत्री आमला, टीनू आनंद, प्रताप पोथन, फरीदा जलाल या कलाकारांच्या महत्त्वाच्या भूमिका होत्या.

आणखी वाचा : ‘फौदा’ सीरिजच्या निर्मात्यांनी व्यक्त केली राजकुमार रावबरोबर काम करायची इच्छा; गोव्याच्या चित्रपट महोत्सवात केला खुलासा

नुकतंच कमल हासन यांनी या चित्रपटाच्या ३५ वर्षपूर्तीनिमित्त एक खास ट्वीट करत या चित्रपटाच्या दिग्दर्शकाचे आभार मानले आहेत. ट्वीटमध्ये कमल म्हणाले, “ज्या ग्रेट दिग्दर्शकांबरोबर मी काम केलं त्यापैकी सिंगीथम श्रीनिवास राव हे आजवरचे एकमेव तरुण दिग्दर्शक. आपला एक छोटासा प्रयत्न म्हणजेच ‘पुष्पक’; त्याला आज ३५ वर्षं पूर्ण झाली आहेत. आपल्याला ही कलाकृती अशीच आणखी बरीच वर्षं चिरतरुण ठेवायची आहे.”

बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरलेल्या पुष्पकला उत्कृष्ट चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कारदेखील मिळाला. कमल आणि सिंगीथम यांनी एकत्र येऊन निर्मिती केलेला हा पहिलाच चित्रपट. यानंतर या जोडीने ‘अपूर्व सगोदरगल’, ‘मायकेल मधना काम राजन’, ‘मुंबई एक्सप्रेस’ आणि ‘सोकोक्कीधी’ यांसारख्या चित्रपटांमध्ये त्यांनी एकत्र काम केलं, पण ‘पुष्पक’ची आजही प्रत्येक प्रेक्षक आठवण काढतो. कमल हासन सध्या त्यांच्या आगामी ‘इंडियन २’ या चित्रपटावर काम करत आहेत, तसंच कमल लवकरच मणिरत्नम यांच्याबरोबरही काम सुरू करणार आहेत.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 28-11-2022 at 11:28 IST

संबंधित बातम्या