Premium

“लाडक्या लेकीचा पहिला सण”, राम चरण आणि उपासनाने साजरी केली गणेश चतुर्थी, पाहा फोटो

रंगीबेरंगी फुलांची आरास, दाक्षिणात्य संस्कृती अन्…, राम चरणने लेकीसह केली गणपती बाप्पाची आराधना

south superstar ram Charan bring bappa home with daughter klin kaara
राम चरण आणि उपासनाने लेकीसह साजरी केली पहिली गणेश चतुर्थी

दाक्षिणात्य सुपरस्टार राम चरणची पत्नी उपासना कामिनेनी २० जून रोजी एका गोंडस मुलीला जन्म दिला. तब्बल ११ वर्षांनी घरात बाळाचं आगमन झाल्याने सध्या संपूर्ण चिरंजीवी कुटुंबात आनंदाच वातावरण आहे. लाडक्या लेकीचं थाटामाटात बारसं करून या लोकप्रिय जोडप्याने तिचं नाव क्लिन कारा कोनिडेला असं ठेवलं. अलीकडेच राम चरण आणि उपासनाने त्यांच्या लेकीसह पहिली गणेश चतुर्थी साजरी केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा : ‘तुझे मेरी कसम’ ते ‘वेड’, रितेश-जिनिलीयाचा रोमॅंटिक व्हिडीओ चर्चेत; नेटकरी म्हणाले, “दादा-वहिनी…”

सुपरस्टार राम चरणने त्याच्या सोशल मीडियावर घरात गणपती बाप्पाची पूजा केल्याचे काही फोटो शेअर केले आहेत. अभिनेत्याच्या घरात बाप्पासाठी आकर्षक सजावट आणि रंगीबेरंगी फुलांची आरास करण्यात आली आहे.

राम चरण आणि उपासनाने जोडीने बाप्पाची आराधना केली. यावेळी अभिनेत्याचे आई-वडील चिरंजीवी आणि सुरेखा, त्याच्या बहिणी सुश्मिता आणि श्रीजा, आजी अंजना देवी आणि कुटुंबातील इतर काही सदस्य उपस्थित होते.

हेही वाचा : विराट-अनुष्काच्या घरी गणेशोत्सवाची तयारी, अभिनेत्रीने शेअर केलेला ‘तो’ फोटो चर्चेत

अभिनेत्याने कुटुंबातील सर्व सदस्यांचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. त्याने कॅप्शनमध्ये त्याच्या सर्व चाहत्यांना गणेश चतुर्थीच्या शुभेच्या दिल्या आहेत. “आमच्या लाडक्या क्लिन कारासह आम्ही पहिला सण साजरा करत आहोत.” असं त्याने कॅप्शनमध्ये म्हटलं आहे. दरम्यान, राम आणि उपासना यांनी १४ जून २०१२ रोजी लग्नगाठ बांधली होती. या लोकप्रिय दाक्षिणात्य जोडप्याने खूप विचार करून लेकीचं नाव ठेवलं आहे. क्लिन कारा कोनिडेला या नावाचा अर्थ आध्यात्मिक जागृती करणाऱ्या उर्जेचं प्रतिक असा होतो.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: South superstar ram charan bring bappa home with daughter klin kaara see pics from celebrations sva 00

First published on: 18-09-2023 at 20:11 IST
Next Story
“माझी हाडं खूपच…”; अनुराग कश्यपची मुलगी आलियाचं स्वत:च्या वजनाबाबत मोठं भाष्य, म्हणाली “लोकांच्या कमेंट्स…”