दाक्षिणात्य सुपरस्टार राम चरण ( Ram Charan ) सध्या त्याचा आगामी चित्रपट ‘गेम चेंजर’मुळे चर्चेत आला आहे. या चित्रपटात राम चरण अभिनेत्री कियारा अडवाणीबरोबर झळकणार आहे. त्यामुळे रामच्या चाहत्यांमध्ये ‘गेम चेंजर’ चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे. या चित्रपटाच्या जबरदस्त पोस्टर्स आणि गाण्यांमुळे प्रेक्षकांमधील उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. नुकताच या चित्रपटाचा टीझर लाँच सोहळा लखनऊमध्ये पार पडला. यावेळी राम चरण अनवाणी पायाने पोहोचलो होता. त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतं आहे.

‘गेम चेंजर’ चित्रपटाच्या टीझर लाँच सोहळ्यासाठी शनिवारी सकाळी राम चरण ( Ram Charan ) हैदराबाद एअरपोर्टवर पोहोचला. यावेळी काळ्या रंगांच्या कपड्यांमध्ये तो पाहायला मिळाला. काळा कुर्ता, काळी पँट आणि त्याबरोबर खांद्यावर एक गमछा अशा लूकमध्ये राम चरण दिसला. पण यावेळी त्याने चपल किंवा बुट घातले नव्हते. तो अनवाणी पायाने एअरपोर्टला पोहोचला होता. राम चरणच्या याच लूकने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

women are saying no to sex after Trumps win
डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयानंतर अमेरिकेतील महिलांचा लैंगिक संबंधास नकार; कारण काय? काय आहे 4B चळवळ?
Rohit Patil
Rohit Patil : “अमृताहुनी गोड…”; विधानसभेत रोहित पाटलांचं…
R Madhavan Dubai Home Video
आर माधवनचं दुबईतील घर पाहिलंत का? मराठमोळ्या पत्नीबरोबर दिवाळीची पूजा, सरिताच्या मराठी लूकने वेधलं लक्ष
sai tamhankar arrange diwali pahat for loved ones
मुंबईत ४५ व्या मजल्यावर आहे सईचं आलिशान घर! लेकीच्या घरी आली लाडकी आई; ‘द इलेव्हन्थ प्लेस’मध्ये रंगली दिवाळी पहाट
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट नावच सांगितलं; म्हणाले…
Kamal Haasan said Sarika would be upset if he offered her money
“मला ती आवडली होती, पण..”, कमल हासन यांनी सारिकाबद्दल केलेलं वक्तव्य; म्हणालेले, “तिला खूप अपमानास्पद…”
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले त्या मधुरिमा राजे कोण आहेत?
Woman driving BMW steals flower pot from outside Noida shop, video goes viral
“अशा श्रीमंतीचा काय उपयोग?” आलिशान बीएमडब्ल्यूमधून आलेल्या महिलेचं रात्री १२ वाजता लाजीरवाणं कृत्य; VIDEO व्हायरल

हेही वाचा – ७ वर्षांच्या मुलाने धनंजय पोवारचं हातावर काढलं चित्र, आई डीपीला फोटो पाठवून म्हणाली, “दादा काय जादू केली…”

याआधीही राम चरण ( Ram Charan ) काळ्या रंगाच्या कपड्यात अनावणी पायाने दिसला आहे. २०२३ मध्ये जेव्हा ऑस्कर पुरस्कार सोहळ्यासाठी राम चरण भारतातून रवाना झाला होता. तेव्हा देखील राम अशा लूकमध्ये पाहायला मिळाला होता. पण यामागचं नेमकं काय कारण आहे? जाणून घ्या…

हेही वाचा – स्त्रीने टिकली लावण्याविषयी ‘आई कुठे काय करते’ फेम अभिनेत्रीने मांडलं परखड मत, म्हणाली, “आपण आपली संस्कृती…”

दरवर्षी राम चरण ( Ram Charan ) अयप्पा दीक्षा घेतो. ही दक्षिणेकडील एक परंपरा आहे. अयप्पा दीक्षा घेतल्यानंतर संबंधित व्यक्तीला ४१ दिवस ब्रह्मचर्याचं पालन करावं लागतं. भगवान अयप्पाचे भक्त सर्व काही त्याग करून ब्रह्मचर्याचं पालन करतात. ते ४१ दिवस अनवाणी पायाने फिरतात. दरवर्षी राम चरण अयप्पा दीक्षा घेतल्यानंतर अनवाणी पायाने फिरत असतो.

हेही वाचा – ५० दिवसांनंतर ‘नवरा माझा नवसाचा २’ चित्रपट आता ओटीटीवर, कोणत्या प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला? जाणून घ्या…

दरम्यान, राम चरणच्या ( Ram Charan ) आगामी बहुचर्चित चित्रपटाबद्दल बोलायचं झालं तर, पुढच्या वर्षी ‘गेम चेंजर’ चित्रपट प्रदर्शित होणार आहे. राजकीय नाट्य या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. १० जानेवारी २०२५ला ‘गेम चेंजर’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटात राम चरण एक आयएएस अधिकारी राम मदनच्या व्यक्तिरेखेत दिसणार आहे. तर कियारा अडवाणी त्याची गर्लफ्रेंड दाखवण्यात आली आहे.

Story img Loader