‘स्पायडर मॅन : नो वे होम’ हा चित्रपट २०२१ साली प्रदर्शित झाला होता. डेस्टिन डॅनियल क्रेटन दिग्दर्शित ‘स्पायडर मॅन : नो वे होम’ हा चित्रपट एकाअर्थी पीटर पार्करच्या भावविश्वाची अखेर ठरला. जगाला संकटापासून वाचवण्याच्या नादात झालेल्या घोळातून बाहेर पडण्यासाठी पीटरला आपली प्रेयसी एमजे आणि जिवलग मित्र नेडसह सगळ्यांच्याच मनातून त्याच्या आठवणी पुसून टाकाव्या लागणार होत्या. डॉ. स्ट्रेंजच्या मदतीने हे करणारा पीटर आता एकाकी पडला आहे. लोकांच्या मनात केवळ स्पायडर मॅन जिवंत आहे, पण त्याच्यामागचा पीटरचा खरा चेहरा सगळे विसरले आहेत. या अशा अवघड परिस्थितीत आपल्या मनातलं दु:ख आतल्या आत दाबून टाकत एकेक दिवस जगणाºया स्पायडर मॅनची खरी गोष्ट ‘स्पायडर मॅन : ब्रँड न्यू डे’ या सिक्वेलपटात पाहायला मिळते.
‘स्पायडर मॅन : ब्रँड न्यू डे’ हा खºया अर्थाने फक्त स्पायडीची गोष्ट सांगणारा चित्रपट आहे. डेस्टिन डॅनियल क्रेटन यांनीच दिग्दर्शित केलेल्या या सिक्वेलपटात कुठेही माव्र्हल सिनेमॅटिक युनिव्हर्सचा, अॅव्हेंजर्सचा प्रभाव नाही. ब्रुस बॅनरसारखे काही चेहरे इथे डोकावतात, पण तेही फक्त स्पायडीचे प्रश्न सोडवण्यापुरते येतात. न्यूयॉर्क शहरात गुन्हेगारांना वेचून वेचून पकडून देणारा, माणसांच्या गर्दीला हवाहवासा असलेला, त्यांच्यात राहूनही एकटा असणारा आणि ज्या जिवलगांपासून प्रत्यक्षात दुरावला आहे, त्यांची समाजमाध्यमांवरून खबरबात ठेवत त्यांच्या खाणाखुणा जपणारा पीटर पार्कर एका वेगळ्याच विमनस्क मनस्थितीत जगताना दिसतो. दु:ख अंगावरून पांघरून घेऊन जगायची सवय लागलेल्या या सुपरहिरोसमोर एक नवीनच संकट उभं ठाकतं. यावेळी त्याचा सामना थेट एखाद्यााच्या मनात शिरून त्याच्याकडून आपल्याला हव्या त्या गोष्टी करून घेणाºया दुष्ट व्यक्तीशी आहे. मात्र, त्या व्यक्तीचा चेहरा, ओळख त्याला माहिती नाही. एकीकडे ही विचित्र शक्ती बाळगणाºया माणसाला पकडण्याचं, त्याचा हेतू काय हे शोधण्याचं आव्हान त्याच्यासमोर आहे. दुसरीकडे चार वर्षांनी एमजे आणि नेड त्याच्यासमोर येतात. मात्र, या दोघांनाही त्याची ओळख उरलेली नाही. भरीस भर म्हणून एमजे आता दुसºया कोणाच्या प्रेमात आहे हे सत्य त्याच्या नजरेस पडतं आणि तो मनातून अधिक खचतो. त्याचा परिणाम त्याच्या शरीरात आधीच होऊ घातलेल्या बदलांवरही होतो आहे. स्पायडर मॅनच्या शरीरात बदल होतायेत. एखादा कोळी जेव्हा मोठा होतो, तेव्हा त्याच्यात काही बदल होतात, जे आता स्पायडीच्या शरीरातही होतायेत. अगदी सूक्ष्म आवाज त्याच्या कानांना टिपता येतात, त्याच्या मनगटातून जाळं फेकता येतं आहे, त्याच्या क्षमता आधीपेक्षा अधिक वाढल्या आहेत, पण मानसिकदृष्ट्या अस्थिर असल्याने यावर त्याला नियंत्रण मिळवता येत नाही, या सगळ्या दुष्टचक्रात फसलेल्या स्पायडीला नव्या दुष्ट शक्तीला पकडण्यात यश मिळतं का? एमजे आणि नेड यांना पुन्हा पीटरची ओळख पटते का? अशा अनेक प्रश्नांची उत्तरं देत हा चित्रपट स्पायडीच्या प्रगल्भ होत जाण्याचा प्रवास अधिक गहिरेपणाने रंगवतो.
सुपरहिरोला मिळणाºया शक्तींबरोबर त्यांच्या जबाबदाºया अधिक वाढत जातात. आणि त्यात अनेकदा वैयक्तिक नाती, सुख-दु:ख पणाला लागतं. स्पायडीने हे याआधीच अनुभवलं होतं. आंट मेचं जाणं आणि मित्रांचं दुरावणं हा त्याच्यासाठी दुहेरी धक्का आहे. पण, पीटरचं वैयक्तिक सुख-दु:ख वेगळं आणि स्पायडरमॅन म्हणून लोकांचा जीव वाचवण्याची जबाबदारी ही प्राधान्याने आपल्या आयुष्यात राहणार, हे मनोमन तो जाणून असला तरी त्याचा साक्षात्कार त्याला जीन ग्रेमुळे होतो. सॅर्डीने जीन ग्रे हे पात्र साकारलं आहे. जीन एका विशिष्ट उद्देशाने लोकांच्या मनाचा ताबा मिळवून डिपार्टमेंट ऑफ डॅमेज कंट्रोलपर्यंत पोहोचते. त्या इमारतीत असलेली एक गोष्ट तिला हवी आहे. सुरुवातीला खलनायिका म्हणून समोर येणारं हे पात्र शेवटाकडे येता येता आकळत जातं. जीन ग्रे आणि स्पायडी यांच्यातला संवाद, एकमेकांना शह-काटशह देण्याच्या प्रयत्नात उलगडत जाणारे सत्याचे धागे, एकमेकांपेक्षा टोकाचे भिन्न स्वभाव असलेल्या पनिशर आणि स्पायडीचं एकत्र येणं हे या चित्रपटात खूप छान जमून आलेले प्रसंग आहेत. या चित्रपटात आत्तापर्यंत उत्साहाने फसफसणाºया, काहीशा उतावीळ स्पायडीच्या भूमिकेपेक्षा त्याच्या अंतरंगाचे वेगळेच पैलू अभिनेता टॉम हॉलंड याने उलगडले आहेत. पीटर पार्करचं प्रगल्भ होत जाणं त्यातून अधोरेखित झालं आहे. एकीकडे अजूनही एमजेला आतून आपल्या प्रेमाची जाणीव होईल, ही निरर्थक आस पीटरच्या मनात आहे. प्रेम आणि मैत्रीतली एक वेगळीच आणि विरोधाभासी गंमत या चित्रपटातून पाहायला मिळते. पण, खरोखरच स्पायडीला मिसेस स्पायडरमॅन मिळते का? हे चित्रपट पाहूनच समजून घ्यायला हवं. सॅर्डी ंसक, झेंडाया, नेडच्या भूमिकेतला जेकब, जॉन बर्नथलचा पनिशर, मार्क रफेलोचा ब्रुस बॅनर अशी नवी-जुनी मंडळी पुन्हा एकत्र पाहणं हीसुध्दा पर्वणी आहे. चित्रपटाच्या शेवटी एकच क्रेडिट सीन येतो, जो पूर्णत: स्पायडीच्या परतण्याचे संकेत देणारा आहे. त्यामुळे माव्र्हल सिनेमॅटिक युनिव्हर्सचा सुपरहिरो स्पायडरमॅन या पलिकडे अशी ताकद बाळगणाºया एका तरुणाची, माणसाची गोष्ट हे या चित्रपटाचं खरं वैशिष्ट्य ठरलं आहे.
