‘स्प्लिट्सविला’ आणि ‘कुंडली भाग्य’ फेम अभिनेत्री ईशा आनंद शर्माने केलं सिक्रेट मॅरेज

नुकतंच ईशाने पायलट बॉयफ्रेंड वासदेव सिंह जसरोटिया सोबत सिक्रेट मॅरेज केलंय. पण तिने केलेल्या लग्नाची कुणकुण सुद्धा कुणाला लागू दिली नाही.

splits-villa-mtv-wedding
(Photo: Instagram/ishaanandsharmaofficial))

‘स्प्लिट्सविला’ आणि ‘कुंडली भाग्य’ फेम अभिनेत्री ईशा आनंद शर्मा सध्या लाइमलाईटमध्ये आलीय. नुकतंच तिने पायलट बॉयफ्रेंड वासदेव सिंह जसरोटिया सोबत सिक्रेट मॅरेज लग्न केलंय. पण तिने केलेल्या लग्नाची कुणकुण सुद्धा कुणाला लागू दिली नाही. मात्र आता तिच्या लग्नाचे फोटोज सद्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. पायलट बॉयफ्रेंड वासदेव सिंह जसरोटिया सोबत काही काळ घालवल्यानंतर तिला प्रेमाची जाणीव होऊ लागली. तिने तिच्या लव्ह स्टोरीला ‘क्रेझी’ असं म्हटलंय.

ईशा आनंद शर्मा आणि वासदेव सिंह या दोघांनी 2 मे रोजी लग्न केलंय. त्यापूर्वी २ फेब्रूवारी २०२० मध्ये या दोघांनी कोर्ट मॅरेज केलं होतं. दोघांनाही सर्व मित्र-मैत्रीणी आणि नातलगांच्या उपस्थितीत लग्न करण्याची इच्छा होती. यासाठी ते करोनाने निर्माण झालेली भयावह परिस्थिती सामान्य होण्याची वाट पाहत होते. पण लग्न जास्त काळासाठी पुढे ढकलणं हे त्यांच्या कुटुंबीयांना मान्य नव्हतं. त्यामूळे कुटुंबीयांच्या मतांचा आदर ठेवत त्यांनी काही मोजक्या पाहूण्यांच्या उपस्थितीत सिक्रेट मॅरेज केलं. लग्नाच्या सर्व विधी राजस्थानमध्ये पार पडल्या. या दोघांच्या लग्नाबद्दल अनेकांना तर माहिती सुद्धा नव्हती, पण करोनाचा हाहाकार शमल्यानंतर आम्ही मित्र-मैत्रिणी आणि नातलगांसाठी रिसेप्शन ठेवू, असं अभिनेत्री ईशा आनंद शर्माने सांगितलंय.

यापुर्वी १० मे रोजी ईशाने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर एक पोस्ट लिहिली होती. यासोबत तिने अनेक फोटोज देखील शेअर केले होते. “लवकरच एक आनंदाची बातमी मिळणारेय..”, असं तिने यात लिहिलं होत.

ईशा तिच्या लव्ह स्टोरीबद्दल सांगताना म्हणाली, “ही एक क्रेझी लव्ह स्टोरी आहे. वासुदेवला भेटण्यापूर्वीच माझं बॉयफ्रेंडसोबत ब्रेकअप झालं होतं. आमच्या एका कॉमन फ्रेंडच्या गेट-टूगेदर मध्ये आम्ही एकमेकांना भेटलो. तेव्हा ते मला ओळखत होते. इतकंच काय तर मी एका रिलेशनशीपमध्ये होती हे सुद्धा माहित होतं. आम्ही त्या पार्टीत एकमेकांशी बोलू लागलो. त्यावेळी मी त्यांना माझं बॉयफ्रेंडसोबत ब्रेकअप झाल्याचं सांगितलं. जस जसा वेळ आम्ही एकमेकांसोबत घालवू लागलो तेव्हा आम्ही एकमेकांच्या प्रेमात आहोत, याची जाणीव होऊ लागली. एक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर आम्ही लग्न करण्याचा निर्णय घेतला.”

‘छोटी सरदारनी’, कुंडली भाग्य’ आणि ‘सुपर सिस्टर्स’, ‘चलेगा प्यार का जादू; सारख्या मालिकांमध्ये ईशाने आपल्या अभिनयाची जादू दाखवली होती. तसंच एमटीव्ही वरील लोकप्रिय शो ‘स्प्लिट्सविला 9’ मध्ये सुद्धा तिने भाग घेतला होता.

 

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Splitsvilla and kundali bhagya fame actress isha anand sharma has a secret wedding prp