‘चला हवा येऊ द्या’मध्ये मराठमोळ्या अंदाजात दिसणार श्रीदेवी

निळ्या रंगाची आणि भगवा काठ असलेली नववारी साडी तिने नेसली.

श्रीदेवी

आताच्या घडीला संपूर्ण महाराष्ट्राला हसविण्याचा विडा कोणी उचलला असेल तर तो म्हणजे ‘चला हवा येऊ द्या’ कार्यक्रमाणे. आपल्या विनोदांनी निलेश साबळे, भाऊ कदम, श्रेया बुगडे, कुशाल बद्रिके आणि भारत गणेशपुरे यांनी प्रेक्षकांना खळखळून हसविले आहे. मराठीप्रमाणेच या कार्यक्रमाची भुरळ अगदी बॉलिवूडकरांनाही पडल्याचं दिसलं. बॉलिवूडमधील आघाडीचे अभिनेते असलेले सलमान, शाहरुख आणि आमिर यांपासून जॉन अब्राहम, सोनम कपूर, वरुण धवन, किरण रावपर्यंत अनेक सेलिब्रिटींनी ‘चला हवा येऊ द्या’च्या मंचावर हजेरी लावल्याचे पाहायला मिळाले. त्यानंतर आता बॉलिवूडची ‘हवा हवाई’ म्हणजे श्रीदेवीसुद्धा लवकरच तुम्हाला या कार्यक्रमात दिसणार आहे.

वाचा : अन् रागावलेल्या अमृता सिंगने सैफला फटकारले

‘मॉम’ या आगामी चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी श्रीदेवी या हास्यकल्लोळाच्या मंचावर उपस्थिती लावणार आहे. आता मराठी कार्यक्रम म्हटल्यावर साजशृंगारही तसाच हवा ना… नेहमीच आपल्या सौंदर्याने आणि स्टायलने प्रेक्षकांवर भुरळ पाडणाऱ्या श्रीदेवीने यावेळी महाराष्ट्रीय लूकला प्राधान्य दिल्याचे पाहायला मिळेल. निळ्या रंगाची आणि भगवा काठ असलेली सिल्क साडी तिने यावेळी नेसली. विशेष म्हणजे ही साडी तिने नववारी पद्धतीने नेसली आहे. हातात भरघच्च बांगड्या, गळ्यात हार, नाकात नथ, कानात झुमके आणि डोक्यावर चंद्रकोर अशा लूकमध्ये ती तुम्हाला कार्यक्रमात दिसेल.

वाचा : बिग बींच्या नातीसोबत हा ‘मिस्ट्री मॅन’ आहे तरी कोण?

श्रीदेवीसाठी ‘मॉम’ हा चित्रपट खूप खास आहे. कारण हा तिच्या कारकिर्दीतील ३०० चित्रपट ठरणार आहे. तिच्यासोबतच सजल अली, नवाजुद्दीन सिद्दीकी, अक्षय खन्ना या कलाकारांच्यासुद्धा या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका असणार आहेत. सावत्र आई आणि मुलीच्या नात्यावर या चित्रपटातून भाष्य केलं जाणार असल्याचं म्हटलं जात आहे. या चित्रपटाचं एकंदर कथानक पाहता प्रेक्षकांना नव्या धाटणीचा चित्रपट पाहायला मिळणार आहे. दरम्यान, २०१२ मध्ये आलेल्या ‘इंग्लिश विंग्लिश’ चित्रपटानंतर श्रीदेवीचा हा दुसरा चित्रपट आहे. बोनी कपूर यांनीच या चित्रपटाची निर्मिती केली आहे.  रवी उदयवार दिग्दर्शित ‘मॉम’ चित्रपट ७ जुलैला प्रदर्शित होणार आहे.

sridevi

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Sridevi pramote mom movie on chala hawa yeu dya programme on zee marathi

ताज्या बातम्या