दक्षिणेतील ब्लॉकबस्टर चित्रपटांपैकी एक असलेल्या ‘बाहुबली’ने बॉक्स ऑफिसवर नवा इतिहास रचला. या चित्रपटाच्या दोन्ही भागांनी एक हजार कोटींहून अधिक व्यवसाय केला. अभिनेता प्रभास आणि राणा डग्गुबती यांची भूमिका चांगलीच गाजली होती. मात्र, आता बाहुबली चित्रपटाबाबत मोठी बातमी समोर आली आहे. चित्रपटात भल्लाल देवची भूमिका साकारणारा अभिनेता राणा डग्गुबती याने खुद्द याबाबत खुलासा केला आहे.




एसएस राजामौली यांनी बाहुबली चित्रपट बनवण्यासाठी बॅकेकडून ४०० कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते. इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत राणा डग्गुबतीने याबाबतचा खुलासा केला आहे. डग्गुबती म्हणाला, “तीन-चार वर्षांपूर्वी चित्रपटांसाठी पैसा कुठून आला? चित्रपट निर्मात्याचे घर किंवा त्यांची मालमत्ता बँकेत गहाण ठेवून किंवा बँकेकडून कर्ज घ्यायचे. त्यासाठी निर्माते २४ ते २८ टक्के व्याज देत होते. बाहुबलीसारख्या चित्रपटांसाठी निर्मत्यांनी ३०० ते ४०० कोटी रुपये कर्ज घेतले होते.”
राणा डग्गुबती पुढे म्हणाला, “बाहुबली-१’साठी निर्मात्यांनी १८९ कोटींचे कर्ज घेतले होते. साडेपाच वर्षांच्या परतफेडीवर हे कर्ज घेण्यात आले होते. यासाठी व्याजदर २४ टक्के होता. तेलगूमध्ये सर्वाधिक कमाई करणाऱ्या या चित्रपटावर दुप्पट पैसे खर्च करण्यात आले. व्याजाच्या पैशातून निर्मात्यांनी चित्रपटाच्या दुसऱ्या भागाचा काही भागही शूट केला होता. कर्ज घेण्याअगोदर निर्मात्यांनी हा चित्रपट चालेल की पडेल याबाबतचा विचारही केला नव्हता.”
हेही वाचा- रश्मिका मंदाना नाही तर विजय देवरकोंडाला आवडते ‘ही’ मुलगी; अभिनेत्याने फोटो शेअर करत केला खुलासा
बाहुबलीची आत्तापर्यंत दोन भाग प्रदर्शित झाले आहेत. एसएस राजामौली दिग्दर्शित बाहुबलीचा पहिला भाग २०१५ साली प्रदर्शित झाला होता. बाहुबलीच्या पहिल्या भागाने सुमारे ६०० कोटी आणि दुसऱ्या भागाने सुमारे ५०० कोटींची कमाई केली होती.