Premium

‘बाहुबली’ बनवण्यासाठी निर्मात्यांनी बँकेकडून घेतलं होतं ‘एवढ्या’ कोटी रुपयांचे कर्ज; खुलासा करत अभिनेता म्हणाला…

बाहूबलीच्या दोन्ही भागांनी बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती.

Baahubali-
बाहुबली' बनवण्यासाठी निर्मात्यांनी बँकेकडून घेतलं होतं कोट्यावधी रुपयांच कर्ज (संग्रहित छायाचित्र)

दक्षिणेतील ब्लॉकबस्टर चित्रपटांपैकी एक असलेल्या ‘बाहुबली’ने बॉक्स ऑफिसवर नवा इतिहास रचला. या चित्रपटाच्या दोन्ही भागांनी एक हजार कोटींहून अधिक व्यवसाय केला. अभिनेता प्रभास आणि राणा डग्गुबती यांची भूमिका चांगलीच गाजली होती. मात्र, आता बाहुबली चित्रपटाबाबत मोठी बातमी समोर आली आहे. चित्रपटात भल्लाल देवची भूमिका साकारणारा अभिनेता राणा डग्गुबती याने खुद्द याबाबत खुलासा केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा- ‘आदिपुरुष’च्या प्रमोशनसाठी निर्माते खर्च करणार तब्बल ‘एवढे’ करोड रुपये; चित्रपट हिट करण्यासाठी बनवला हा ‘मास्टर प्ल्रॅन’

एसएस राजामौली यांनी बाहुबली चित्रपट बनवण्यासाठी बॅकेकडून ४०० कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते. इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत राणा डग्गुबतीने याबाबतचा खुलासा केला आहे. डग्गुबती म्हणाला, “तीन-चार वर्षांपूर्वी चित्रपटांसाठी पैसा कुठून आला? चित्रपट निर्मात्याचे घर किंवा त्यांची मालमत्ता बँकेत गहाण ठेवून किंवा बँकेकडून कर्ज घ्यायचे. त्यासाठी निर्माते २४ ते २८ टक्के व्याज देत होते. बाहुबलीसारख्या चित्रपटांसाठी निर्मत्यांनी ३०० ते ४०० कोटी रुपये कर्ज घेतले होते.”

हेही वाचा- १६ डिग्री तापमानात शूटिंग अन् ४० तास पाणी न प्यायल्याने…; ‘द केरला स्टोरी’ फेम अदा शर्माने सांगितली भयानक परिस्थिती

राणा डग्गुबती पुढे म्हणाला, “बाहुबली-१’साठी निर्मात्यांनी १८९ कोटींचे कर्ज घेतले होते. साडेपाच वर्षांच्या परतफेडीवर हे कर्ज घेण्यात आले होते. यासाठी व्याजदर २४ टक्के होता. तेलगूमध्ये सर्वाधिक कमाई करणाऱ्या या चित्रपटावर दुप्पट पैसे खर्च करण्यात आले. व्याजाच्या पैशातून निर्मात्यांनी चित्रपटाच्या दुसऱ्या भागाचा काही भागही शूट केला होता. कर्ज घेण्याअगोदर निर्मात्यांनी हा चित्रपट चालेल की पडेल याबाबतचा विचारही केला नव्हता.”

हेही वाचा- रश्मिका मंदाना नाही तर विजय देवरकोंडाला आवडते ‘ही’ मुलगी; अभिनेत्याने फोटो शेअर करत केला खुलासा

बाहुबलीची आत्तापर्यंत दोन भाग प्रदर्शित झाले आहेत. एसएस राजामौली दिग्दर्शित बाहुबलीचा पहिला भाग २०१५ साली प्रदर्शित झाला होता. बाहुबलीच्या पहिल्या भागाने सुमारे ६०० कोटी आणि दुसऱ्या भागाने सुमारे ५०० कोटींची कमाई केली होती.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Ss rajamouli borrowed rs 400 cr for baahubali at 24 percent interest rana daggubati reveals dpj

Next Story
Video: पांढरा कुर्ता, जॅकेट आणि…; टांझानियाच्या किली पॉलला विकी कौशलची भुरळ, प्रतिक्रिया देत अभिनेता म्हणाला…