scorecardresearch

‘पठाण’ आणि ‘आरआरआर’ भिडणार चित्रपटगृहात, राजामौली यांचा ऑस्कर नामांकित चित्रपट पुन्हा होणार प्रदर्शित

काही दिवसांपूर्वीच ‘पठाण’ने एस.एस राजामौली यांचा ऑस्कर नामांकित चित्रपट ‘आरआरआर’चा रेकॉर्ड मोडला होता.

Pathaan rrr

एस.एस राजमौली यांचा ‘आरआरआर’ हा चित्रपटाचं जगभरात नाव होतंय. या चित्रपटात राम चरण आणि ज्युनियर एनटीआर यांच्याबरोबरच अजय देवगण, आलिया भट्ट आणि श्रिया सरनसह हे कलाकार देखी महत्वपूर्ण भूमिकेत दिसत आहेत. या चित्रपटाची आजही जगभरात जादू आहे. ‘गोल्डन ग्लोब्स पुरस्कार सोहळ्या’तही ‘आरआरआर’ ने डंका वाजवला आहे. तर ऑस्करसाठीही या चित्रपटाला संगीत विभागात नामांकन मिळालं आहे. आता हा चित्रपट पुन्हा एकदा चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

सध्या चित्रपटगृहात सर्वत्र ‘पठाण’चा बोलबाला आहे. प्रदर्शनाच्या आधीपासूनच या चित्रपटाने नवे विक्रम नोंदवायला सुरुवात केली होती. तर आतापर्यंत या चित्रपटाने अनेक रेकॉर्ड्स मोडले आहेत. काही दिवसांपूर्वीच ‘पठाण’ने एस.एस राजामौली यांचा ऑस्कर नामांकित चित्रपट ‘आरआरआर’चा रेकॉर्ड मोडला होता. ॲडव्हान्स बुकिंगच्या बाबतीत ‘पठाण’ने ‘आरआरआर’ला मागे टाकलं. आता हाच चित्रपट पठाणला टक्कर देण्यासाठी येणार आहे.

आणखी वाचा : ‘पठाण’ने मोडला ऑस्करच्या शर्यतीत आलेल्या ‘आरआरआर’चा रेकॉर्ड, ‘या’ बाबतीत चित्रपटाला टाकलं मागे

‘पठाण’प्रमाणेच ‘आरआरआर’ चित्रपटाने देखील बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. या चित्रपटाने जगभरातून १००० हून अधिक कोटींची कमाई केली होती. तर या चित्रपटातील ‘नाटू नाटू’ गाण्याला ऑस्करमध्ये बेस्ट ओरिजनल सॉंग या कॅटेगरीमध्ये नामांकन झालं आहे. आता हाच जगप्रसिद्ध चित्रपट पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ९५ व्या ऑस्कर निकालापूर्वी ‘आरआरआर’चे निर्माते हा चित्रपट थिएटरमध्ये पुन्हा प्रदर्शित करण्याच्या तयारीत आहेत. निर्माते हा चित्रपट पुन्हा प्रदर्शित करण्यासाठी थिएटर्सची यादी, भाषा आवृत्ती आणि वेळ शॉर्टलिस्ट करत आहेत. १२ मार्च २०२३ रोजी डॉल्बी थिएटरमध्ये होणार आहे.

हेही वाचा : ‘पठाण’च्या कमाईचा वेग मंदावला, आठव्या दिवशी जमवला ‘इतक्या’ कोटींचा गल्ला

हा चित्रपट पुन्हा एकदा प्रदर्शित होत असल्याने पुढील महिन्यात हा चित्रपट कशी कामगिरी करतोय हे पाहण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत. तेव्हा पठाण हा चित्रपटही चित्रपट गृहात असेल. त्यामुळे आता या दोन सुपरहिट चित्रपटांमध्ये स्पर्धा पहायला मिळणार आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 02-02-2023 at 15:52 IST