दाक्षिणात्य अभिनेत्रींचा आलियाने मोडला रेकॉर्ड? ‘RRR’साठी घेतले ‘इतके’ मानधन

‘RRR’ या चित्रपटासाठी आलियाने तगडे मानधन घेतल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.

ss rajamouli rrr, ss rajamouli, rrr, alia bhatt, alia bhatt upcoming movie, alia bhatt rrr,
या चित्रपटाच्या माध्यमातून आलिया दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण करणार आहे.

बॉलिवूडची अतिशय क्यूट अभिनेत्री म्हणून आलिया भट्ट ओळखली जाते. ती लवकरच एस एस राजमौली यांच्या ‘RRR’ या चित्रपटात महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून आलिया दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण करणार आहे. पण या चित्रपटासाठी आलियाने घेतलेले मानधन इतर दाक्षिणात्य अभिनेत्रींच्या तुलनेत जास्त असल्याचे म्हटले जाते.

‘RRR’ या चित्रपटात आलिया ‘सीता’ ही भूमिका साकारणार आहे. चित्रपटातील तिचा लूक सोशल मीडियावर चर्चेत देखील होता. ‘टाइम्स ऑफ इंडिया’ने दिलेल्या वृत्तानुसार, या चित्रपटासाठी आलियाने ६ कोटी रुपये मानधन घेतले असल्याचे म्हटले जाते. हे मानधन टॉलिवूडमधील इतर अभिनेत्रींच्या तुलनेत जास्त असल्याचे म्हटले जात आहे. पण बॉलिवूडमधील आलियाचे चित्रपट पाहाता निर्मात्यांनी तिला तगडे मानधन देण्याचा निर्णय घेतला असल्याचे म्हटले जाते.

आणखी वाचा : कमाईमध्ये दाक्षिणात्य अभिनेत्री अव्वल, एका चित्रपटासाठी घेतात इतके मानधन

 

View this post on Instagram

 

A post shared by SS Rajamouli (@ssrajamouli)

काही दिवसांपूर्वी ‘आरआरआर’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला होता. टीझर पाहाता चित्रपटाची कथा स्वातंत्र्यपूर्व काळातील दाखवण्यात येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. तसेच चित्रपटाची कथा आंध्र प्रदेश आणि तेलंगणा राज्यातील अलुरी सिथारामराजु व कोमराम भीम या स्वातंत्र्यवीरांवर आधारित आहे. ज्युनिअर एनटीआर हा कोमराम भीम ही भूमिका साकारणार आहे.

आलियासोबतच ‘आरआरआर’ चित्रपटात राम चरण, अजय देवगण, ओलिविया मॉरिस, ज्युनिअर एनटीआर हे कलाकारही स्क्रीन शेअर करणार आहेत. हा चित्रपट ८ जानेवारी २०२१ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार होता. पण करोना व्हायरसमुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे चित्रपटाच्या प्रदर्शनाती तारीख पुढे ढकलण्यात आली. हा चित्रपट तेलुगू, हिंदी, तामिळ, मल्याळम आणि कन्नड भाषेत प्रदर्शित होणार आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Ss rajamouli rrr movie alia bhatt is getting paid huge amount avb

ताज्या बातम्या