मुलांच्या आयुष्यातील तिढा सोडवण्यासाठी अरुंधतीने कसली कंबर!

‘आई कुठे काय करते’ मालिकेत नवं वळण

स्टार प्रवाहवरील ‘आई कुठे काय करते’ या मालिकेतून एका कर्तव्य दक्ष आणि जबाबदार गृहिणीची कथा दाखवण्यात आली आहे. या मालिकेला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळतेय. घरातील गृहिणी नोकरी करत नसली तरी एक बायको, आई, सून अशा अनेक जबाबदाऱ्या पार पाडताना तिची तारेवरती कसरत होते हे या मालिकेतून मांडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

सध्या या मालिकेचं कथानक उत्कंठावर्धक वळणावर येऊन पोहचलं आहे. एकीकडे पतीच्या नात्याचा गुंता सोडवत असताना अरुंधतीसमोर मुलांच्या भवितव्याचा प्रश्न उभा राहिला आहे. एकिकडे यश गौरीचं नव्यानं खुलणारं नातं, मात्र या नात्याला अनिरुद्धचा विरोध अशी स्थिती निर्माण झाली आहे. यश गौरीचं नातं अनिरुद्धला पटलेलं नसलं तरी अरुंधतीने मात्र ठाम भूमिका घेत या नात्याला होकार दिला आहे.

अभिषेक आणि अंकितामध्ये बिनसल्यानंतर सुस्वभावी अनघा अरुंधतीला अभिषेकची परफेक्ट लाईफ पार्टनर वाटली. अभिषेकलाही अनघा आवडू लागली आहे. मात्र इथेही अनिरुद्धची नकार घंटा आहेच. त्यामुळे अभिषेकचं मन जपत अरुंधतीला यातून मार्ग काढायचा आहे.

इशाच्या आयुष्यातही सध्या बरेच चढउतार सुरु आहेत. ज्या मुलाच्या प्रेमात इशा पडली आहे. त्याची पार्श्वभूमी फारशी बरी नाही. अर्थात इशाला याची जाणीव नसली तरी अरुंधतीने हे अचूक हेरलं आहे. त्यामुळे तिन्ही मुलांच्या आयुष्यातल्या या नव्या वळणाला सामोरं जाण्यासाठी अरुंधतीने कंबर कसली आहे. त्यामुळे अरुंधती मुलांच्या आयुष्यातील तिढा कसा सोडवणार हे पहाणं उत्सुकतेचं

 

 

 

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Star pravah aai kuthe kai karte serial on new dramatic track arundhati stand for kids kpw