किर्तनकार शिवलीला पाटील यांचे नाव ‘शिवलीला’ का आहे? जाणून घ्या

शिवलीला यांच्या आईने त्यामागची गोष्ट सांगितली आहे.

shivalila balsaheb patil, bigg boss contestant,

छोट्या पडद्यावरील वादग्रस्त पण तितकाच लोकप्रिय रिअॅलिटी शो म्हणून ‘बिग बॉस’ ओळखला जातो. १९ सप्टेंबर रोजी बिग बॉस मराठी सिझन ३ प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. जवळपास दोन वर्षांनंतर बिग बॉस हा शो प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. शोमध्ये किर्तनकार शिवलीला बाळासाहेब पाटील यांची एण्ट्री झाली आहे.

शिवलीला यांनी बिग बॉसमध्ये एण्ट्री करताच शोचे सूत्रसंचालक महेश मांजरेकर यांच्याशी गप्पा मारल्या. दरम्यान शिवलीला यांचे आई-वडील त्यांना भेटण्यासाठी आले होते. तेव्हा महेश मांजरेकर यांनी त्यांच्या आई-वडिलांना त्यांचे नाव शिवलीला का ठेवले असा प्रश्न विचारला. तेव्हा त्यांनी दिलेल्या उत्तराने सर्वांचे डोळे पाणावले आहेत.

शिवलीला यांच्या आईने सांगितले की लग्नाच्यानंतर जवळपास सात वर्षे त्यांना मुल झाले नव्हते. नंतर त्यांनी शिवलीला ग्रंथाचं १०८ वेळा पारायण केलं. त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांना बाळ झाल्याचे स्वप्न पडले. शिवलीला यांच्या आईने त्यांच्या आईला याबाबत सांगितले तर त्यांनी त्याकडे फार लक्ष दिले नाही. शिवलीला यांच्या आई डॉक्टरकडे गेल्या तेव्हा डॉक्टरांनी त्या प्रेग्नंट असल्याचे सांगितले. त्यामुळे त्यांनी मुलीचे नाव शिवलीला ठेवले असे सांगितले आहे.

किर्तनकार शिवलीला बाळासाहेब पाटील अवघ्या पाच वर्षांच्या असल्यापासून किर्तन करत आहेत. आजवर १० हजारांहून अधिक किर्तनांचा टप्पा त्यांनी पार केलाय. खास करून तरुण पिढीचं नेतृत्व करणाऱ्या शिवलीला तरुणांसाठी समाजप्रबोधनाचं काम करतात. ‘बिग बॉस मराठी’च्या घरात आता शिवलीला यांच्या किर्तनाच्या जादूने स्पर्धकांमध्ये भक्तीमय वातावरण निर्माण करण्यासाठी सज्ज झाल्या आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Story behind shivalila balsaheb patil avb

ताज्या बातम्या