‘द काश्मीर फाईल्स’ आणि ‘आरआरआर’ अशा सुपरहीट चित्रपटांना मागे टाकत एका गुजराती चित्रपटाने ऑस्करमध्ये भारताचं प्रतिनिधीत्व करण्याची संधी मिळवली आहे. ‘छेल्लो शो’ असं या गुजराती चित्रपटाचं नाव आहे. चित्रपटांसाठीचा सर्वोच्च सन्मान मानल्या जाणाऱ्या ऑस्कर पुरस्कारासाठी भारतातर्फे यंदा ‘छेल्लो शो’ या गुजराती भाषेतील चित्रपटाची निवड करण्यात आल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. त्यामुळे हा चित्रपट नेमका कोणत्या विषयावर आधारित आहे आणि चित्रपटाशी संबंधित इतर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न प्रेक्षक करत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘छेल्लो शो ’ या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन पॅन नलिन यांचे असून १४ ऑक्टोबर रोजी हा चित्रपट देशभरात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाने अनेक आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये भारताचं प्रतिनिधीत्व करत प्रशंसा मिळवली आहे. पन नलिन हे आंतरराष्ट्रीय चित्रपटसृष्टीतील एक ताकदीचे नाव आहे. पॅन नलिन यांचे संसारा, व्हॅली ऑफ फ्लॉवर्स आणि अँग्री इंडियन गॉडेसेस हे गाजलेले चित्रपट आहेत.  

‘छेल्लो शो’ याचा अर्थ शेवटचा शो असा होतो. या चित्रपटात एका नऊ वर्षांच्या मुलाची कथा दाखवण्यात आली आहे. जो त्याच्या वडिलांना गुजरातमधील रेल्वे स्टेशनवर चहा विकण्यात मदत करतो. तो स्वतः ट्रेनमध्ये बसलेल्या प्रवाशांना चहा विकतो. पण एके दिवशी त्याचे वडील त्याला त्याच्या कुटुंबासह एक चित्रपट पाहण्यासाठी घेऊन जातात आणि तिथून त्याला सिनेमाचं जग आवडू लागतं. तो शाळेतून पळून जाऊन सिनेमा बघायला लागतो, त्यामुळे तो वडिलांचा मारही खातो. त्याच्याकडे सिनेमा बघण्यासाठी पैसे नसतात तेव्हा तो सिनेमा हॉलमध्ये प्रोजेक्टर चालवणाऱ्या माणसाशी मैत्री करतो. त्याला आईने बनवलेला स्वतःचा शाळेचा टिफिन देऊन तो प्रोजेक्टर रूममधून रोज चित्रपट पाहतो. पण कालांतराने बऱ्याच गोष्टी बदलतात आणि प्रोजेक्टर असलेला सिनेमा हॉल बंद होतो. तेव्हा तो त्याच्या मित्रांबरोबर मिळून टाकाऊ वस्तूंपासून एक प्रोजेक्टर तयार करतो आणि थिएटरमध्ये पडलेल्या रील बॉक्सचा वापर करून चित्रपट पाहतो.

दरम्यान, ‘ऑस्कर पुरस्कारासाठी भारतातर्फे कोणता चित्रपट पाठवायाचा याबाबत दीर्घ चर्चा झाली. एस. एस. राजमौलीचा ‘आरआरआर’, रणबीर कपूर अभिनित ‘ब्रह्मास्त्र’, विवेक अग्निहोत्री यांचा ‘द काश्मीर फाइल्स’ आणि आर. माधवन यांचे दिग्दर्शन असलेला ‘रॉकेटरी’ या चित्रपटांवर चर्चा झाल्यानंतर ‘चेल्लो शो’ या चित्रपटाची एकमताने निवड करण्यात आली,’’ असे एफएफआयचे अध्यक्ष टी. पी. अगरवाल यांनी सांगितले.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Story of gujarati film chhello show entry to oscars 2023 see trailer release date hrc
First published on: 21-09-2022 at 21:10 IST