|| रेश्मा राईकवार

लहानपणी मुली कित्येकदा घर – घर खेळताना दिसतात. त्या खोट्या खोट्या घरात आपणच खोटे आई – बाबा बनायचं, भावंडं तयार व्हायची, खोटा स्वयंपाक के ला जायचा. लहानपणीचा हा भातुकलीचा खेळ मनाला आनंद देऊन जायचा. पण प्रत्यक्षात अशा पद्धतीने आपणच आपलं कु टुंब ठरवू शकतो का? ज्यांना आईवडील नाहीत, त्यांचं कु टुंब असू शकत नाही का? घर बनण्यासाठी रक्ताचीच नाती असणं गरजेचं आहे का? अशा प्रशद्ब्रांना हाताशी धरत ‘हम दो हमारे दो’चं कथानक मांडलं गेलं आहे. ‘डिस्नो हॉटस्टार’वर प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाची कथा आई-वडील दत्तक घेणाऱ्या नायकाची कथा सांगते, मात्र त्याविषयी किमान गांभीर्याने बोलण्याऐवजी के वळ मनोरंजन करण्याच्या उद्देशाने या कु टुंबाची कथा रचण्यात आली आहे.

अनाथ असलेला तरीही स्वत:च शिक ण्याची धडपड करून स्वत:चा स्टार्टअप सुरू करत उद्योजक म्हणून नावारूपाला आलेला धु्रव (राजकु मार राव) अन्याच्या (क्रिती सनन) प्रेमात पडतो. रुढार्थाने सगळं काही असलेल्या धु्रवकडे फक्त  त्याचं म्हणावं असं कु टुंब नाही आहे. आणि नेमकी हीच गोष्ट त्याच्या आणि अन्याच्या लग्नाआड येते आहे. अन्याला कु टुंब असलेल्या मुलाशी लग्न करायचं आहे. शेवटी अन्याबरोबर विवाह करून आपलं एक कु टुंब सुरू करावं याचं स्वप्न पाहणारा ध्रुव खोटे आई-वडील उभे करतो. पुरुषोत्तम मिश्रा आणि दीप्ती कश्यप या दोघांनाही त्याने आपले खोटे आई-वडील म्हणून उभं के लं असलं तरी या दोघांचाही त्याच्या आयुष्यात छोटासा का होईना कु ठेतरी संबंध जोडला गेलेला आहे. ऐन लग्नाच्या सुमारास अन्यासमोर हा खोट्या कु टुंबाचा खेळ उघडा पडतो. आणि मग पुढे काय होतं हे खरंतर सुज्ञांस सांगणे न लगे…

आजच्या जगात के वळ रक्ताची नातीच महत्त्वाची ठरतात असं नाही, अनेकदा माणुसकीच्या, प्रेमाच्या नात्याने जोडल्या गेलेल्याही अशा कित्येक व्यक्ती आहेत ज्या कु टुंबाप्रमाणेच वागत असतात. अगदी सख्खे शेजारीही कु टुंबाप्रमाणे राहत असल्याची उदाहरणं कमी नाहीत. मात्र लग्नाचा विषय येतो तेव्हा अनेकदा मुलगा किं वा मुलगी कोणत्या घराण्यातील आहेत, त्यांची जात, त्यांचा वर्ग (इथे आर्थिक) अशा कितीतरी फु टपट्ट्या महत्त्वाच्या ठरतात. हा विषय म्हणून खरोखरच चांगला आहे आणि योगायोगाने अशा विषयासाठी ज्या ताकदीचे कलाकार हवेत तेही इथे होते. मात्र तरीही लेखक-दिग्दर्शक जोडीला याचा उपयोग करून घेता आला नाही. प्रशांत झा यांना पटकथा लिहिताना इतका चांगला विषय के वळ हसण्यावारी का न्यावासा वाटला हे एक कोडेच आहे. तीच गोष्ट दिग्दर्शकाचीही आहे. इतक्या चांगल्या विषयावर के वळ अशा पद्धतीची सरधोपट मांडणी करून नेमकं  प्रेक्षकांना काय सांगायचं होतं हे लक्षात येत नाही. धु्रवला कु टुंबाची उणीव भासते आहे हे अगदी एखाददुसऱ्या प्रसंगात लक्षात येतं. एरव्ही तोही या सगळ्याकडे उरका लवकर आणि चढवा मला बोहल्यावर इतपतच मर्यादित दृष्टिकोनातून पाहतो आहे असंच वाटत राहतं. त्यामुळे अचानक एका क्षणी हे माझे आई-वडील का असू शकत नाहीत, म्हणत त्याने के लेला अततायीपणाही खरा वाटत नाही.

जवळपास सगळेच चांगले कलाकार या चित्रपटात आहेत. क्रिती सनन आणि राजकु मार राव ही जोडी मुख्य भूमिके त आहे. या दोघांनीही आपापल्या भूमिका चांगल्या वठवल्या आहेत, पण या दोघांमधील के मिस्ट्री ‘बरेली की बर्फी’मध्ये जशी जमून आली होती, तशी ती यात दिसत नाही. किं वा त्यांच्यातील नातं फु लवायलाही दिग्दर्शकाने तेवढा वेळ दिलेला नाही. त्याउलट, परेश रावल आणि रत्ना पाठक शहा यांच्यातील अबोल प्रेमाची गोष्ट अगदी काही क्षणांतही बरंच काही सांगून जाते. या संपूर्ण चित्रपटात या दोघांचाच अभिनय पाहात राहावासा वाटतो. रत्ना पाठक शहा यांनी धु्रवच्या आईच्या भूमिके त शिरल्यानंतरची त्यांची देहबोली, त्यांचा अभिनय, अगदी बारीकसारीक गोष्टीतून दिसणारा त्यांचा वावर हा खूप काही सांगून जाणारा आहे. तीच गोष्ट परेश रावल यांनी साकारलेल्या पुरुषोत्तमची म्हणता येईल. अनुभवी कलाकार म्हणजे काय याची प्रचीती या दोघांक डे पाहून येते. या दोघांनी खऱ्या अर्थाने चित्रपटात मजा आणली आहे, मात्र त्यांच्याही कथेला या लगीनघाईत फारसा वाव मिळालेला नाही. सचिन-जिगर यांनी दिलेलं संगीत ही चित्रपटाची जमेची बाजू म्हणता येईल. लहानपणीच्या भातुकली खेळाचं पडद्यावरचं मोठं रूप एवढंच फारतर ‘हम दो हमारे दो’ या चित्रपटाबाबत म्हणता येईल.

हम दो हमारे दो

दिग्दर्शक – अभिषेक जैन

कलाकार – राजकु मार राव, क्रिती सनन, अपारशक्ती खुराणा, परेश रावल, रत्ना पाठक शाह, मनु रिषी चढ्ढा, प्राची शहा.