सुबोध भावे करतोय ट्विटर अकाऊंट डिलीट; वाचा त्याची शेवटची पोस्ट

त्याने अचानक हा निर्णय का घेतला असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.

मराठीतील आघाडीचा अभिनेता सुबोध भावे ट्विटर अकाऊंट डिलीट करत आहे. याबाबत सुबोधने स्वत: ट्विट करत सांगितलं आहे. सुबोध सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असतो. त्यामुळे त्याने अचानक हा निर्णय का घेतला असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.

सोशल मीडियावरील वाढत्या नकारात्मकतेमुळे सुबोधने ट्विटर अकाऊंट डिलीट करण्याचा निर्णय घेतल्याचं समजतंय. मात्र याबाबत नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. ‘आपल्या सर्वांचं प्रेम आणि आशीर्वाद मिळाला त्याबद्दल धन्यवाद. मी माझा ट्विटर अकाऊंट डिलीट करतो आहे. काळजी घ्या, मस्त राहा, जय महाराष्ट्र, जय हिंद’, असं त्याने शेवटचं ट्विट केलं.

‘ट्विटर अकाऊंट डिलीट करणे ही एक पळवाट आहे. जे ट्विटर फॉलोअर्स तुमच्यावर निखळ प्रेम करतात, त्यांना शिक्षा का,’ असा सवाल चाहत्यांनी सुबोधला विचारला आहे. ट्विटर अकाऊंट डिलीट करण्याचा निर्णय योग्य नाही असं म्हणत अनेकांनी खंत व्यक्त केली आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Subodh bhave is going to delete his twitter account check his last post ssv

ताज्या बातम्या