पाहाः प्रशांत दामले, सुबोध भावे यांच्या भो भो चित्रपटाचा मोशन पोस्टर

‘भो भो’ ही एका कुत्र्याभोवती फ़िरणारी मर्डर मिस्ट्री आहे.

सुमुखेश फिल्म्स प्रस्तुत आणि भरत गायकवाड दिग्दर्शित ‘भो भो’ हा वेगळ्या पठडीतला चित्रपट आहे. नुकताच या सिनेमाचे मोशन पोस्टर लॉन्च करण्यात आले आहे. ‘भो भो’ ही एका कुत्र्याभोवती फ़िरणारी मर्डर मिस्ट्री असून या चित्रपटात प्रशांत दामले ह्या अगोदर कधीच न पाहिलेल्या भूमिकेत दिसतील. त्यांच्यासोबत सुबोध भावे, शरद पोंक्षे, अश्विनी एकबोटे, संजय मोने, किशोर चौगुले, सौरभ गोखले आणि अनुजा साठे या कलाकारांच्या ही भूमिका आहेत.
वेगळ्या कथाविषयामुळे ‘भो भो’ चित्रपटाविषयी प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली आहे. हा चित्रपट प्रेक्षकांच पूर्ण मनोरंजन करेल असा विश्वास निर्माता दिग्दर्शक भरत गायकवाड यांनी व्यक्त केला. २२ एप्रिलला ‘भो भो’ सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Subodh bhave prashant damales bho bho movie motion poster launch