छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री सुधा चंद्रन या सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ते चाहत्यांच्या संपर्कात राहतात. नुकताच सुधा यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ शेअर करत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे एक विनंती केली आहे.

सुधा जेव्हापण विमानतळावर जातात, तेव्हा त्यांना सतत थांबवलं जातं. एवढंच नाही तर सुरक्षारक्षक त्यांचा कृत्रिम पाय काढून त्याची तपासणी करतात. सुधा यांनी एका रोड अपघातात दोन्ही पाय गमावले होते. तेव्हापासून त्या कृत्रिम पाय वापरत आहेत.

आणखी वाचा : जात लपवण्यासाठीच वडिलांनी स्वीकारलं ‘बच्चन’आडनाव, अमिताभ यांचा खुलासा

दरम्यान, सुधा यांनी हा व्हिडीओ त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. या व्हिडीओत सुधा म्हणाल्या, “कृत्रिम पाय काढण्याची प्रक्रिया अत्यंत त्रासदायक आहे आणि त्या प्रत्येक वेळी विमानतळावर असलेल्या अधिकाऱ्यांना ईटीडी टेस्ट करण्याची विनंती करते, मात्र काही उपयोग होत नाही आणि ते मला माझे कृत्रिम पाय काढायला सांगतात.”

आणखी वाचा : ‘एवढं मोठ घर काय कामाचं आहे…’, हातातील कॉफी मगमुळे करीना झाली ट्रोल

पुढे त्या नरेंद्र मोदी यांना प्रश्न करत बोलतात, “हे शक्य आहे का? हा आपला देश आहे का? आपल्या समाजात एखादी स्त्री दुसऱ्या स्त्रीला हाच मान देते का? मोदीजींना माझी नम्र विनंती आहे की कृपया ज्येष्ठ नागरिकांना एक कार्ड द्या, ज्यात ते ज्येष्ठ नागरिक आहेत असे लिहिले आहे. त्यात असे लिहिले पाहिजे की त्यांना विशेष आव्हान दिले आहेत. मी तीच प्रक्रिया पुन्हा पुन्हा करते हे देखील खूप लाजिरवाणे आहे.”