scorecardresearch

आर्यन खानच्या सुटकेनंतर सुहानाची पहिली पोस्ट, खास फोटो शेअर करत अनन्या पांडेला दिल्या शुभेच्छा

सुहानाने अनन्याच्या वाढदिवसानिमित्ताने एक फोटो शेअर करत तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत

आर्यन खानच्या सुटकेनंतर सुहानाची पहिली पोस्ट, खास फोटो शेअर करत अनन्या पांडेला दिल्या शुभेच्छा

शाहरुख खानची मुलगी सुहाना खानने भाऊ आर्यन खानची सुटका झाल्यानंतर पहिली पोस्ट शेअर केलीय. मात्र ही पोस्ट तिने आर्यनसाठी केली नसून एनसीबीने चौकशीसाठी बोलावलेल्या तिच्या मैत्रिणीसाठी म्हणजेच अनन्या पांडेसाठी केली आहे. सुहानाने अनन्याच्या वाढदिवसानिमित्ताने एक फोटो शेअर करत तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

सुहानाने अनन्या आणि तिची बहिण रिसासोबतचा एक जुना फोटो शेअर करत तिला शुभेच्छा दिल्या आहेत. हा फोटो तिने इन्स्टास्टोरीला शेअर केलाय. या फोटोला कॅप्शन देत ती म्हणाली, “वाढदिवसाच्या शुभेच्छा, आय लव्ह यू टू पीस”. सुहानाने शेअर केलेला अनन्यसोबतचा हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या फोटोत तिघी एका रेस्टॉरन्टमध्ये बसलेल्या दिसत आहेत.

…आणि भर पार्टीत अंकिताने सगळ्यांसमोरच बॉयफ्रेण्डला केलं किस, सोशल मीडियावर चर्चा


करीना कपूर, फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रा तसचं करण जोहर अनेकांनी सोशल मीडियावरून अनन्या पांडेला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

सुहाना आणि अनन्या गेल्या दोघी गेल्या काही दिवसांपासून चर्चेत होत्या. आर्यन खानच्या अटकेनंतर अनन्या पांडेला देखील एनसीबीने चौकशीसाठी बोलावलं होतं. एनसीबीला आर्यन खानच्या व्हाटस्अप चॅटमध्ये अनन्यासोबत केलेलं संशयास्पद चॅट सापडलं होतं. दोघांमध्ये ड्रग्ज खरेदीवरून चॅट झाल्याचं वृत्त समोर आलं होतं. त्यानंतर एनसीबीने समन्स बजावत अनन्याला तीन वेळा चौकशीसाठी बोलावलं होतं.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 31-10-2021 at 13:19 IST

संबंधित बातम्या