‘सुखं म्हणजे नक्की काय असतं!’ मालिकेत नवा ट्वीस्ट, गौरीला कळणार वडिलांच्या मृत्यूमागचे सत्य

मात्र लवकरच या मालिकेत एक नवा ट्वीस्ट येणार आहे.

‘सुखं म्हणजे नक्की काय असतं!’ ही मालिका सध्या प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरताना दिसत आहे. स्टार प्रवाह वाहिनीवरील या मालिकेतील जयदीप आणि गौरीच्या जोडीने चाहत्यांनी मनं जिकली आहेत. सध्या या मालिकेत जयदीप आणि गौरीच्या लग्नाचा थाट पाहायला मिळत आहे. माई आणि दादांच्या इच्छेखातर पुन्हा एकदा लग्नाचा घाट घालण्यात आला आहे. मात्र लवकरच या मालिकेत एक नवा ट्वीस्ट येणार आहे.

सुख म्हणजे नक्की काय असते या मालिकेतील जयदीप आणि गौरी यांचे पुन्हा एका थाटामाटात लग्न पार पडते. यामुळे घरात शिर्के पाटील कुटुंबात आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. मात्र लवकरच या आनंदात विरजण पडणार आहे. कारण गौरीसमोर तिच्या वडिलांच्या मृत्यूबाबतचे एक मोठे सत्य येणार आहे.

हेही वाचा : ‘निदान सॉरी म्हणायला तरी…’, हिंदी अभिनेत्रीमुळे ‘चला हवा येऊ द्या’ मधील कलाकार त्रस्त

नुकतंच मराठी टेलिव्हीजन इन्फॉर्मेशन या इन्स्टाग्राम पेजने याबाबतचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओ गौरी सर्वांसमोर तिच्या वडिलांच्या मृत्यूमागील एक सत्य सांगताना दिसत आहे. गौरीच्या वडिलांचा खून गुंडांनी नाही तर दादासाहेबांनीच केला, असे सत्य गौरीपुढे आल्याचे दिसत आहे. हेच सत्य ती सर्वांना सांगत असल्याचे पाहायला मिळत आहे.

यानंतर आता गौरी यावर कशी प्रतिक्रिया देणार, शिर्के-पाटील कुटुंबातील व्यक्ती यानंतर दादांना काय प्रश्न विचारणार? हे सर्व पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. तसेच गौरीच्या आयुष्यात येणाऱ्या या अनपेक्षित वळणामुळे तिला धक्का बसणार का? याची देखील चाहत्यांना उत्सुकता पाहायला मिळत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Sukh mhanje nakki kay ast serial update gauri father death truth reveled nrp

Next Story
सुशांत सिंह राजपूतच्या आठवणीत सारा अली खान झाली भावूक, पोस्ट शेअर करत म्हणाली…
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी