‘सुख म्हणजे…’ मालिकेतील ‘या’ अभिनेत्याचा झाला साखरपुडा, फोटो शेअर करत दिली गूडन्यूज

त्याने इन्स्टाग्राम पोस्ट शेअर करत याबाबतची गुडन्यूज दिली आहे.

‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ ही छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय मालिका आहे. या मालिकेने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. मालिकेत गौरी आणि जयदीप यांची अनोखी प्रेमकहाणी दाखवण्यात आली आहे. तसेच अभिनेत्री वर्षा उसगावकर या मालिकेत महत्त्वाच्या भूमिकेत दिसत आहे. या मालिकेत सर्वच पात्रांनी प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. याच मालिकेत उदय शिर्के पाटील ही भूमिका साकारणारा अभिनेता संजय पाटील याचा नुकतंच साखरपुडा झाला आहे. त्याने इन्स्टाग्राम पोस्ट शेअर करत याबाबतची गुडन्यूज दिली आहे.

अभिनेता संजय पाटील याने इन्स्टाग्रामवर काही फोटो पोस्ट करत सर्व चाहत्यांना याबाबतची माहिती दिली आहे. त्याने त्याच्या होणाऱ्या पत्नीसोबत काही फोटो पोस्ट केले आहेत. अबोली गोखले असे त्याच्या होणाऱ्या पत्नीचे नाव आहे. “माझे आयुष्य सुंदर करणारी परी आहेस तू, मनापासून तुझ्यावर जीव लावणाऱ्या या हृदयाची राणी आहेस तू,” असे कॅप्शन देत त्याने त्याच्या पत्नीसोबत फोटो पोस्ट शेअर केले आहे.

संजय आणि अबोलीचा साखरपुडा हा ५ नोव्हेंबर २०२१ रोजी पार पडला. “आजपासून मी कधीही एकटा चालणार नाही,” असेही त्याने हे फोटो शेअर करताना म्हटले आहे. दरम्यान अबोली ही एक वेलनेस ब्लॉगर आहे. त्यासोबतच ती पोषणतज्ञ, योग सल्लागारही आहे.

दरम्यान सध्या‘सुख म्हणजे नक्की काय असतं’या मालिकेचं कथानक अतिशय रंजक वळणावर येऊन ठेपलं आहे. या मालिकेत लवकरच कबड्डीचा सामना रंगणार आहे. शालिनीनं शिर्केपाटील कुटुंबाची बळकावलेली प्रॉपर्टी मिळवण्यासाठी तिच्या वडिलांच्या टीमसोबत कबड्डीचा सामना जिंकावा लागेल अशी अट तिने घातली आहे. यामुळे जयदीप-गौरी आणि संपूर्ण कुटुंबानं कंबर कसून सरावाला सुरुवात केली आहे. येत्या १० नोव्हेंबरला कबड्डीच्या या सामन्याचा भाग प्रदर्शित केला जाणार असल्याचे बोललं जात आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Sukh mhanje nakki kay asta fame uday shirke patil engaged photo viral on social media nrp

Next Story
प्रत्यक्षाहुनी उत्कट : सण-उत्सवांची ‘व्हर्च्युअल’ प्रतिमा!
ताज्या बातम्या