‘सांग तू आहेस का?’ फेम सुलेखा तळवलकरच्या मुलीने काय केलं माहितेय?

या मालिकेतील आत्याची भूमिका साकारणारी अभिनेत्री सुलेखा तळवलकर हिच्या मुलीची चर्चा सध्या जोरात सुरूय. यामागचं कारणही तसंच आहे.

sulekha-Talwalkar-daughte- tia-talwalkar-who-became-instant-internet-sensation
(Photo:Instagram@sulekhatalwalkar_official)

‘सांग तू आहेस का’ ही मालिका सध्या प्रेक्षकांच्या फेव्हरेट लिस्टमध्ये आहे. या मालिकेला आणि मालिकेतील कलाकारांना प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतलंय. या मालिकेतील आत्याची भूमिका साकारणारी अभिनेत्री सुलेखा तळवलकर हिने आपल्या चेहरी हावभाव आणि दमदार अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात एक वेगळीच छाप सोडलीय.

छोट्या पडद्यावरील अनेक मालिकांमध्ये कधी आई तर कधी सासूच्या भूमिकेत अभिनेत्री सुलेखा तळवलकर घराघरात पोहोचली आहे. ‘सांग तू आहेस का?’ या मालिकेत आत्याच्या भूमिकेत ती खलनायिका म्हणून प्रेक्षकांच्या समोर आली असली तरी तिच्या अभिनयाच्या कौशल्याचं कौतुक नेहमीच केलं जातं. पण सध्या सुलेखा तळवलकर नव्हे तर तिच्या मुलीची चर्चा रंगताना दिसून येतेय. यामागचं कारणही तसंच आहे.
अभिनेत्री सुलेखा तळवलकर या सुप्रसिद्ध अभिनेत्री आणि दिग्दर्शिका स्मिता तळवलकर यांची सून आहे. स्मिता तळवलकर यांचा मुलगा अंबर तळवलकर याच्याशी तिने लग्न केलं. या दोघांना मुलगा आर्य आणि मुलगी टिया ही दोन अपत्ये आहेत. सुरेखा तळवलकर हिची मुलगी टिया ही तिच्या इतकीच सुंदर दिसते. तसंच तळवलकर ग्रुप्सचे अनेक ठिकाणी असलेल्या फिटनेस सेंटर्सची जबाबदारी देखील ती चोखपणे सांभाळते. इतकंच काय तर आई सुलेखा तळवलकर हिच्यासोबत वेगवेगळ्या रेसिपी यूट्यूब चॅनलवर शेअर करताना दिसून येतेय. ती अभिनय क्षेत्रात नसली तरी तिला वेगळ्या क्षेत्रात करिअर करायची इच्छा आहे.

टियाने नुकतंच एका सौंदर्य स्पर्धेमध्ये सहभाग घेतला आणि या पहिल्याच स्पर्धेत तिने प्रथम स्थानापर्यंत मजल मारली आहे. नुकत्याच झालेल्या ‘मिस दादर’ २०२१ स्पर्धेमध्ये टियाला प्रथम पारितोषिक मिळालं आहे. सौंदर्य स्पर्धा आपल्या मुलीने जिंकल्याचा आनंद आई सुलेखा तळवलकर हिने तिच्या सोशल मीडियावर व्यक्त केलाय. अनेक स्तरातून टियाचं कौतुक केलं जातंय.

आपल्या लेकीचे हे कौतुक पाहून सुलेखा तळवलकरला तिचा आनंद गगनात मावेनासा झालाय. टियाला जरी वेगळ्या क्षेत्रात करिअर करण्याची इच्छा असली तरी भविष्यात मॉडेलिंग आणि अभिनयाची इच्छा झाली तर तिचे हे यश नक्कीच उपयोगी पडेल याबाबत शंका नाही.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Sulekha talwalkar daughter tia talwalkar who became instant internet sensation prp

Next Story
प्रत्यक्षाहुनी उत्कट : सण-उत्सवांची ‘व्हर्च्युअल’ प्रतिमा!
ताज्या बातम्या