Sulochana Chavan passed away msr 87 | Loksatta

ज्येष्ठ ‘लावणीसम्राज्ञी’ सुलोचना चव्हाण यांचं निधन

प्रकृती मागील काही दिवसांपासून खालावलेली होती.

sulochana chavan
(संग्रहित)

मराठी मनोरंजन विश्वासाठी एक धक्का देणारी बातमी आहे. ज्येष्ठ लावणीसम्राज्ञी सुलोचना चव्हाण यांचे वयाच्या ९२ व्या वर्षी निधन झाले. वृध्दापकाळाने त्यांचे निधन झाल्याची माहिती त्यांचा मुलगा विजय चव्हाण यांनी दिली आहे.

लावणी आणि सुलोचना ताईंचे वेगळेच नाते होते. मराठी चित्रपटसृष्टीत ठसकेबाज लावणी गात त्यांनी एक वेगळीच भूरळ श्रोत्यांना घातली होती. त्यांच्या निधनाने संपूर्ण कलासृष्टीतून हळहळ व्यक्त केली जात आहे.

त्यांच्या पार्थिवावर आज ३ वाजता मरीन लाईन्सच्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहेत. तब्बल ६० वर्षांहून अधिक काळ मराठी रसिक मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या सुलोचना चव्हाण यांची प्रकृती मागील काही दिवसांपासून खालावलेली होती.

याशिवाय काही शस्त्रक्रियाही झाल्याने आणि वाढलेल्या आजारपणामुळे त्यांची प्रकृती चिंताजनक होती. अखेर आज (१० डिसेंबर) त्यांची प्राणज्योत मालवली.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 10-12-2022 at 12:41 IST
Next Story
सौदीमध्ये हृतिक रोशनने घालवला पाकिस्तानी अभिनेत्रीबरोबर वेळ; घेतला रुचकर जेवणाचा आस्वाद