VIDEO: ‘द कपिल शर्मा शो’मधील सुमोना सिगारेट ओढतानाचा व्हिडिओ व्हायरल

अभिनेत्री सुमोना चक्रवर्ती ही नववारी नेसून सिगारेट ओढताना दिसली.

सिनेजगत असो किंवा टेलिव्हिजन अनेक कलाकारांना दारू पिण्याची किंवा सिगारेट ओढण्याची सवय असते. पण असे असले तरी कलाकार शक्यतो कधीही कॅमेरासमोर सिगारेट ओढत नाहीत किंवा तसं कुणाला शूटही करू देत नाही. पण  ‘द कपिल शर्मा शो’ मध्ये साधी सरळ दिसणा-या सुमोनाला सिगारेट ओढण्याची सवय आहे.
अभिनेत्री सुमोना चक्रवर्ती ही नववारी नेसून सिगारेट ओढताना कॅमेरात कैद झाली असून याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. शूटींग दरम्यान ब्रेकमध्ये ती सेटबाहेर उभी राहून सिगारेट ओढताना या व्हिडिओत दिसते. नुकतीचं ‘सैराट’ चित्रपटाची संपूर्ण टीम ‘द कपिल शर्मा शो’च्या सेटवर गेली होती. त्यावेळच्या भागात सुमोनाने हीच नववारी परिधान केलेली होती.  त्याच दरम्यानचा हा व्हिडिओ असल्याचे दिसून येत आहेत. (छाया सौजन्यः युट्यूब)

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Sumona chakravarti caught smoking at the kapil sharma show

ताज्या बातम्या