‘द कपिल शर्मा शो’मधून सुमोनला दाखवला बाहेरचा रस्ता? सोशल मीडिया पोस्ट चर्चेत

‘द कपिल शर्मा शो’च्या प्रोमोमध्ये सुमोना नव्हती. त्यानंतर ती या शोमध्ये दिसणार नाही अशा चर्चा सुरु झाल्या आहेत.

sumona chakravarti, the kapil sharma show
'द कपिल शर्मा शो'च्या प्रोमोमध्ये सुमोना चक्रवर्ती दिसली नाही.

छोट्या पडद्यावरील ‘द कपिल शर्मा’ शो हा लोकप्रिय कॉमेडी शो आहे. या शो मधील प्रत्येक कलाकाराने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. नुकताच ‘द कपिल शर्मा शोचा प्रोमो प्रदर्शित करण्यात आला आहे. या प्रोमोमध्ये कपिल शर्मा, भारती सिंग, कृष्णा अभिषेक आणि सुदेश लहरी पर्यंत सगळे कलाकार दिसत होते. मात्र, त्यात सुमोना चक्रवर्ती नव्हती. सुमोनाचे लाखो चाहते आहेत आणि सुमोना प्रोमोमध्ये दिसली नाही म्हणून तिचे चाहते निराश झाले आहेत.

‘बॉलिवूड लाइफ’ने दिलेल्या वृत्तानुसार, सुमोनाला आता कपिल शर्मा शोमध्ये पाहता येणार की नाही या बद्दल काही सांगता येणार नाही. मात्र, शोबद्दल सुमोना आणि निर्मात्यांमध्ये चर्चा सुरु आहे. मात्र, सुमोनाच्या इन्स्टाग्राम पोस्टमुळे चर्चा सुरु झाली आहे की सुमोना आता ‘द कपिल शर्मा शो’चा भाग नसणार आहे.

 

sumona chakravarti, the kapil sharma show
सुमोनाच्या पोस्टवरून सोशल मीडियावर चर्चांना उधान

 

सुमोनाने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवरून एक पोस्ट शेअर केली आहे. “जर तुम्हाला कोणत्या गोष्टीची संधी मिळत असेल तर आपण ती संधी गमवायला नको. कारण तुम्हाला हे कधीच कळणार नाही की ते तुमच्यासाठी योग्य आहे की नाही. मग ती नवीन नोकरी, नवीन शहर किंवा एक नवीन अनुभव असो. मनापासून काम करा आणि दुसऱ्या कोणत्या ही गोष्टीचा विचार करू नका. जर आपण त्यात यशस्वी झालो नाही तर समजून घ्या की आपल्यासाठी ती गोष्ट योग्य नाही. त्यानंतर कोणत्याही गोष्टीची खंत न बाळगता तुम्ही पुढे जाऊ शकाल, कारण तुम्हाला माहित असेल की यासाठी तुम्ही कठोर परिश्रम केले आहे. मग आता आपण हे का करू शकत नाही,” असे सुमोना म्हणाला.

आणखी वाचा : …म्हणून शिल्पाने विकला बुर्ज खलिफामधील ५० कोटी रुपयांचा फ्लॅट

आणखी वाचा : ‘बाबा!!! आई आली’, रितेश- जेनेलियाचा मजेशीर व्हिडीओ व्हायरल

“हे जाणून घ्यायला खूप वाईट वाटतं की आपण कोणत्या गोष्टीला चांगल्या प्रकारे सांभाळू शकतो किंवा त्याच्यात आपण चांगल काम करू शकलो असतो. म्हणून येणाऱ्या संधीचा फायदा घेण्याचा प्रयत्न करा, पूर्ण मेहनत करा आणि पाठी वळून पाहू नका,” अशा आशयाची पोस्ट सुमोनाने केली आहे.

 

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Sumona chakravarti pens a note after released a promo of the kapil sharma show dcp

ताज्या बातम्या