सध्या अनेक मराठी मालिकांचं शूटिंग महाराष्ट्रा बाहेर सुरू आहे. घरापासून आणि आपल्या माणसांपासून दूर राहून हे कलाकार प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी शूटिंग करत आहेत. बऱ्याचदा अनेक तास शूटिंग करत असतानाही अनेक कलाकार शूटिंग मधुन वेळ काढत मनोरंजन करण्याचे मार्ग शोधत असता. कलर्स मराठी वाहिनीवरील ‘सुंदरा मनामध्ये भरली’ य़ा मालिकेने प्रेक्षकांच्या मनामध्ये घर केलंय. मालिकेला प्रेक्षकांची चांगली पसंती मिळतेय.
या मालिकेतील लतीका आणि अभिमन्यूची जोडी प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन करतेय. पडद्यावर हे कलाकार प्रेक्षकांचं मनोरंजन करत असतानाच पडद्यामागेदेखील या दोघांची धमाल पाहायला मिळते. शूटिंगच्या सेटवरचे धमाल व्हिडीओ शेअर करून ते प्रेक्षकांचं मनोरंजन करत असतात. नुकताच या मालिकेतील लतीकाने म्हणजेच अभिनेत्री अक्षया नाईकने एक व्हिडीओ तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केलाय. हा व्हि़डीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.
अक्षयाने शेअर केलेल्या व्हि़डीओत ती सेटवऱच्या ड्रेसिंग रुममध्ये काही दागिगे पाहताना दिसतेय. एवढ्यात मालिकेतील अभिमन्यू म्हणजेच अभिनेचा समीर पराजपे तिला हार पाहिजे का विचारतो. यावर लतीका त्याला हो असं उत्तर देते. त्यानंतर मात्र अभिमन्यू तिला हटके स्टाईलने “तो जा लेके आ” असं म्हणतो आणि धक्का देता. य़ानंतर मात्र व्हिडीओत खरी धमाल पाहायला मिळते. काही मिनिटांनी असं म्हणतं नंतर व्हिडीओत लतीका अभिमन्यूला चोपताना दिसतेय. छत्रीने लतीका अभिमन्यूला बदडवून काढतेय. तर अभिमन्यू रडत रडत “लेके आता हू” म्हणतोय.
अभिमन्यू आणि लतीकाच्या या धमाल कॉमेडी व्हि़डीओला प्रेक्षकांनी मोठी पसंती दिलीय. अक्षयाने हा व्हि़डीओ शेअर करत कॅप्शनमध्ये “शूटिंगच्या व्यस्त वेळापत्रकात आम्ही अशा प्रकारे स्वत: च मनोरंजन करतो. तुम्हाला हा व्हिडीओ पाहून नक्कीस हसू येईल अशी आशा आहे. ” असं ती म्हणालीय. तर पुढे असे प्रयोग तुम्ही करू नका अशी सुचना अक्षयाने दिलीय.
‘सुंदरा मनामध्ये भरली’ या मालिकेतील कलाकार सेटवर कायम धमाल करताना दिसतात. तसचं सेटवरील हे धमाल व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत ते चाहत्यांचं मनोरंजन करतात.
