scorecardresearch

सुनील ग्रोवर अमिताभ बच्चन यांच्या वारंवार पाया पडला; कारण दडलंय या व्हिडीओमध्ये, एकदा पाहाच

सुनील ग्रोवर आणि अमिताभ बच्चन यांचा हा व्हिडीओ सध्या चर्चेत आहे.

sunil grover touches amitabh bachchan feet, sunil grover amitabh bachchan funny video, rashmika mandanna goodbye, goodbye trailer, goodbye movie neena gupta amitabh bachchan, entertainment news, amitabh bachchan news, amitabh bachchan age, सुनील ग्रोवर, अमिताभ बच्चन, सुनील ग्रोवर व्हिडीओ
अमिताभ बच्चन घरबसल्या व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून कार्यक्रमात सहभागी झाले होते.

अमिताभ बच्चन यांच्या ‘गुडबाय’ या चित्रपटाची सध्या चर्चा आहे. चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासून सर्वत्र त्याचीच चर्चा होत आहे. अलीकडेच या चित्रपटाच्या ट्रेलर लाँचवेळी अमिताभ बच्चन आणि सुनील ग्रोव्हर यांच्यात असे काही घडले की उपस्थितांना हसू आवरणंही कठीण झालं. ‘गुडबाय’मध्ये अमिताभ बच्चन यांच्याशिवाय सुनील ग्रोव्हरचीही भूमिका आहे. चित्रपटाच्या ट्रेलर लाँचच्या वेळी संपूर्ण कलाकार उपस्थित होते, तर अमिताभ बच्चन घरबसल्या व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून कार्यक्रमात सहभागी झाले होते.

अमिताभ बच्चन यांना स्क्रीनवर पाहून सुनील ग्रोव्हरने उडीच मारली आणि एकदा नव्हे तर पुन्हा पुन्हा त्यांच्या पायांना स्पर्श केला. त्याच्या या स्टाइलवर अमिताभही खूश होते. सुनील ग्रोव्हर जेव्हाही अमिताभ यांच्या पायाला स्पर्श करायचा तेव्हा ते त्याला आशीर्वाद द्यायचे आणि तो पुन्हा त्यांच्या पायांना स्पर्श करायचा. अमिताभ बच्चन आणि सुनील ग्रोव्हर यांच्यातील हा फनी स्टाइल व्हिडीओ पाहून कार्यक्रमात उपस्थित असलेले सगळेच हसू सागले. सुनील ग्रोव्हरच्या पायाला वारंवार हात लावल्यावर अमिताभ म्हणायचे, ‘हे घे पुन्हा एकदा घे. पुन्हा एकदा घे. घाबरून नकोस. मी तुला सोडणार नाही.’
आणखी वाचा- Goodbye Trailer : अमिताभ बच्चन- रश्मिका मंदाना यांच्या ‘गुडबाय’चा ट्रेलर प्रदर्शित, पाहा व्हिडीओ

‘गुडबाय’मध्ये अमिताभ बच्चन वडिलांच्या भूमिकेत आहेत, तर रश्मिका मंदाना त्यांच्या मुलीच्या भूमिकेत आहे. दुसरीकडे अमिताभ यांच्या पत्नीच्या भूमिकेत नीना गुप्ता तर सुनील ग्रोवर पंडिताच्या भूमिकेत दिसणार आहेत. चित्रपटाची कथा एका कुटुंबाची आहे, ज्यामध्ये आईच्या मृत्यूनंतर अनेक ट्वीस्ट येतात. ‘गुडबाय’ हा चित्रपट विकास बहल दिग्दर्शित असून ७ ऑक्टोबरला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाशिवाय अमिताभ बच्चन ९ सप्टेंबरला प्रदर्शित होणाऱ्या ‘ब्रह्मास्त्र’मध्येही दिसणार आहेत.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 07-09-2022 at 16:53 IST

संबंधित बातम्या