Sunil Pal कॉमेडियन सुनील पाल ( Sunil Pal ) बेपत्ता झाल्याची माहिती समोर आली आहे. एका शोसाठी सुनील पाल हे गेले होते. मात्र ते बेपत्ता झाले आहेत अशी तक्रार त्यांची पत्नीने सांताक्रुझ पोलीस ठाण्यात दिली आहे. गेल्या अनेक तासांपासून सुनील पाल बेपत्ता आहेत अशी माहिती त्यांच्या पत्नीने दिली आहे. सुनील पाल ( Sunil Pal ) यांच्या पत्नी सांताक्रुझ पोलीस ठाण्यात पोहचल्या. सुनील पाल बेपत्ता झाल्याची तक्रार त्यांनी नोंदवली आहे.

सुनील पाल यांच्या पत्नीने काय म्हटलं आहे?

“सुनील आज घरी येणं अपेक्षित होतं, मात्र ते घरी आलेले नाहीत. तसंच त्यांचा फोन स्विच ऑफ लागतो आहे. अनेक तासांपासून त्यांच्याशी संपर्क झालेला नाही. त्यामुळे सुनील बेपत्ता झाल्याची तक्रार देण्यासाठी मी पोलीस ठाण्यात आले आहे.” असं सुनील पाल यांच्या पत्नीने म्हटलं आहे. IANS या वृत्त संस्थेने हे वृत्त दिलं आहे. कॉमेडियन कपिल शर्मा आणि सुनील पाल ( Sunil Pal ) यांची एकदम खास मैत्री आहे. सुनील पाल यांच्या बेपत्ता झाल्याची तक्रार आल्यानंतर आता पोलीसही सक्रिय झाले आहेत. सुनील पाल ( Sunil Pal ) हे अनेकदा त्यांच्या शोसाठी मुंबईच्या बाहेर जातात. त्यांच्या पत्नीने सांगितलं सुनील मुंबई बाहेर शो करायला गेले होते, आज परतणं अपेक्षित होतं. मात्र ते परत आलेले नाहीत. त्यामुळे सुनील पाल यांच्या पत्नीने पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे.

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू

हे पण वाचा- “नेटफ्लिक्स अडल्ट आणि गलिच्छ…”, ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’बद्दल कॉमेडीयन सुनील पालची टीका, म्हणाला…

Sunil Pal Missing
कॉमेडियन सुनील पाल बेपत्ता (फोटो-फेसबुक पेज, सुनील पाल)

सुनील पाल यांचं करिअर

सुनील पाल हा प्रसिद्ध कॉमेडियन आहे. त्याने अनेक कॉमेडी शोजमध्ये भाग घेतला आहे. सुनील पालने ( Sunil Pal ) त्याच्या करिअरमध्ये अनेक चित्रपटांमध्येही काम केलं आहे. फिर हेराफेरी, अपना सपना मनी मनी, बॉम्बे टू गोवा, किक या सिनेमांतून त्याने आपल्याला हसवलं आहे. तसंच भक्त जनो हे त्याचं स्किट प्रचंड गाजलं होतं. २०१८ मध्ये त्याने तेरी भाभी है पहले नावाच्या सिनेमात काम केलं होतं. त्यानंतर तो सिनेमांत झळकलेला नाही. मात्र सोशल मीडियावर तसंच वेगवेगळ्या रिअॅलिटी शोजमध्ये त्याने भाग घेतला आहे. तसंच सोशल मीडियावरही तो सक्रिय होता. हाच सुनील पाल बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवण्यात आली आहे.

Story img Loader