scorecardresearch

“१४ वर्षांपूर्वी या दिवशी…”, सनी लिओनीने आईच्या आठवणीत शेअर केली भावूक पोस्ट

सनी हा फोटो शेअर करताना फार भावूक झाल्याचे पाहायला मिळत आहे.

बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनी ही नेहमीच काही ना काही कारणांमुळे चर्चेत असते. सनी ही सोशल मीडियावर कायमच सक्रिय असल्याचे पाहायला मिळते. ती नेहमी तिच्या सिनेसृष्टीसह वैयक्तिक आयुष्याबद्दल विविध खुलासे करत असते. नेहमी हसतमुख आणि आनंदी राहणारी सनी मात्र नुकतंच भावूक झाली आहे. सनी लिओनी नुकतंच तिच्या आईच्या आठवणीत भावूक झाल्याचे पाहायला मिळत आहे. नुकतंच तिने याबाबत एक पोस्टही शेअर केली आहे.

सनी लिओनीने इन्स्टाग्रामवर तिच्या बालपणीचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत तिच्यासोबत तिचे आई वडील आणि भाऊ पाहायला मिळत आहे. त्यांचा संपूर्ण कुटुंबाचा हा एकत्रित फोटो फारच सुंदर असल्याचे दिसत आहे. यात सनी ही तिच्या वडिलांच्या खांद्यावर बसल्याचे दिसत आहे. सनी हा फोटो शेअर करताना फार भावूक झाल्याचे पाहायला मिळत आहे.

तिने हा फोटो शेअर करतेवेळी त्याला भावनिक कॅप्शनही दिले आहे. “काही लोकांना त्यांच्या पालकांची तेव्हा आठवण येते जेव्हा त्यांच्यासोबत काही चुकीचे घडतं. पण मला मात्र माझ्या प्रत्येक आनंदाच्या क्षणी आणि खास प्रसंगी तुमची नेहमी आठवण येते. १४ वर्षांपूर्वी या दिवशी तू आम्हाला सोडून गेली होतीस. मला तुझी खूप आठवण येते आणि मी तुझे स्मितहास्य पाहण्यासाठी काहीही करेन. पण एकदा मला गोगू म्हणून आवाज दे. लव्ह यू आई”, असे तिने म्हटले आहे.

सनीचे संपूर्ण बालपण तिच्या कुटुंबासोबत कॅनडामध्ये गेले. सनीच्या आईचे २००८ तर वडिलांचे २०१० मध्ये निधन झाले. त्यानंतर सनीने २०११ मध्ये सलमान खानच्या बिग बॉस शोमधून हिंदी सिनेसृष्टीत प्रवेश केला. या शोनंतरच तिला पहिला बॉलिवूड ब्रेक मिळाला होता.

Video : भर मुलाखतीत चिन्मय मांडलेकरच्या एका कृतीने वेधलं लक्ष, दिग्पाल लांजेकर म्हणाले “हे पाहून…”

जिस्म २ या चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर सनी अनेक चित्रपटांमध्ये दिसली. नुकतंच सनी लिओनीची अनामिका ही वेबसिरीज प्रदर्शित झाली आहे. तिचे अनेक चाहते तिच्या या वेबसिरीजची आतुरतेने वाट पाहत होते. यामुळे सध्या ती चांगलीच चर्चेत आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Sunny leone became emotional after remembering her mother said say gogu one more time nrp

ताज्या बातम्या