सनी लिओनी ‘मधुबन में राधिका नाचे’ या तिच्या अलिकडेच प्रदर्शित झालेल्या गाण्यामुळे चर्चेत आहे. सनीच्या या गाण्याला प्रेक्षकांचा संमिश्र प्रतिसाद मिळाला. काहींना सनीचं हे गाणं आवडलं असलं तरी अनेकांनी या गाण्याला विरोध केल्याचं पाहायला मिळालं. सनीनं या गाण्यावर धम्माल डान्स केला असला तरीही तिच्या या डान्सला मथुरा येथील काही संतांनी विरोध करत, तिचा डान्स अश्लिल असल्याचं म्हटलं आहे. यासोबतच सनीच्या गाण्यावर बंदी घालण्याची मागणीही त्यांनी केली आहे.


सनी लिओनीच्या गाण्यावर मथुरा येथील संतांनी आक्षेप घेतला आहे. ‘सनी लिओनीनं या गाण्यावर अश्लिल डान्स केला आहे. त्यामुळे हिंदू धर्मियांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत.’ असा आरोप सनीवर करण्यात आला आहे. यासोबतच सनीच्या या व्हिडीओ अल्बमवर बंदी घालण्याची मागणी करण्यात आली आहे आणि असं न केल्यास सनीच्या विरोधात खटला दाखल करण्यात येईल असा इशाराही या संतांकडून देण्यात आला आहे.

wildlife lovers, Tigers, forest, cages,
‘वाघ जंगलात नको, पिंजऱ्यात हवेत का?’ वन्यजीवप्रेमींचा सवाल; प्रकरण काय? जाणून घ्या…
sangli lok sabha, BJP, Miraj Pattern,
भाजपच्या ‘मिरज पॅटर्न’चा फज्जा
pashmina march will be held there on April 7 to highlight the issues in Ladakh
लडाखवासीयांचा आक्रोश सरकारच्या कानावर पडतच नाही; तुम्हाला तरी ऐकू येतोय?
Boy killed for resisting unnatural act Sheel Daighar police arrests two
अनैसर्गिक कृत्यास विरोध केल्याने मुलाची हत्या, शीळ डायघर पोलिसांनी केली दोघांना अटक


सनी लिओनीचं ‘मधुबन में राधिका नाचे’ हे गाणं २२ डिसेंबरला प्रदर्शित झालं होतं. प्रदर्शनानंतर काही वेळातच हे गाणं खूप व्हायरल झालं आणि त्यावरून सनीला खूप ट्रोल करण्यात आलं होतं. या गाण्यावर सनी ज्याप्रकारे डान्स करत आहे त्याला अनेकांनी अश्लिल डान्स म्हटलं आहे. ‘राधा आमच्यासाठी पूज्यनीय आहे आणि या गाण्यामुळे विशेषतः सनीच्या डान्समुळे हिंदू धर्मियांच्या भावना दुखावल्या जात आहेत. त्यामुळे या गाण्यावर बंदी घालावी.’ अशी मागणी केली जात आहे.

‘मधुबन में राधिका नाचे’ हे एक अल्बम सॉन्ग आहे. या गाण्याच्या डान्सची कोरिओग्राफी प्रसिद्ध नृत्य दिग्दर्शक गणेश आचार्य यांनी केली आहे. हे गाणं वर्षाच्या अखेरस हिट होईल असं निर्मात्यांना वाटलं होतं. मात्र आता हे गाणं दिवसेंदिवस वादाच्या भोवऱ्यात अडकताना दिसत आहे.