सनी लिओनी-डॅनियल वेबरच्या घरी हलणार पाळणा!

डॅनियलच्या आईला आता नातवंडाचे तोंड पाहण्याची इच्छा आहे.

पुढच्यावर्षी सनीचा 'मस्तीजादे' हा चित्रपट प्रदर्शित होईल.

‘बिग बॉस’द्वारे प्रसिद्धीस आलेली पॉर्नपरी सनी लिओनी बॉलीवूडमध्ये आता ब-यापैकी स्थिरावली आहे. बॉलीवूडला आपल्या सौंदर्याची भुरळ घालणारी ही अभिनेत्री लवकरच गोड बातमी देणार असल्याचे कळते.
डीएनए या इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, सनी आणि तिचा पती डॅनियल हे बाळाचा विचार करत आहेत. यासंबंधी सनी म्हणाली की, डॅनियलच्या आईला आता नातवंडाचे तोंड पाहण्याची इच्छा आहे. आम्हाला दोघांनासुद्धा मुल हवे आहे. पण, सध्या माझ्यावर कामाचा ताण आहे. त्यामुळे आम्ही योग्य वेळेच्या प्रतीक्षेत आहोत. आपल्या सुखी वैवाहिक आयुष्याबद्दल बोलतना सनी म्हणाली की, डॅनियल माझा खूप चांगला मित्र आहे. आम्ही दोघांनी चांगला-वाईट काळ एकत्र बघितला आहे. मला जेव्हा कधी काही दुविधा असते मी त्याच्याशी बोलते आणि त्याचे मत घेते. तो नेहमीच माझ्यासोबत असतो.
पुढच्यावर्षी सनीचा ‘मस्तीजादे’ हा चित्रपट प्रदर्शित होईल.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Sunny leone daniel weber all set to welcome their baby

ताज्या बातम्या