सोशल मीडियावर सध्या तुफान लोकप्रिय असलेल्या ‘टिकटॉक’ या व्हिडिओ अॅपवर एकीकडे बंदीची मागणी होत असताना अभिनेत्री सनी लिओनीला टिकटॉक व्हिडिओची भुरळ पडली आहे. टिकटॉक व्हिडिओ करणाऱ्या एका तरुणाच्या प्रेमात सनी पडली आहे. त्या तरुणाला सनीच्या टीमने शोधून काढलं आणि त्याच्यासोबत सनीने टिकटॉक व्हिडिओ केले आहेत.

सनीने तिच्या इन्स्टाग्रामवर टिकटॉकचे तीन-चार व्हिडिओ पोस्ट केले आहेत. शेजादा कक्कर या तरुणाचे टिकटॉक व्हिडिओ सनीला फार आवडले आहेत. ‘कोणालाही न जुमानता बिनधास्तपणे आणि आत्मविश्वासाने टिकटॉक व्हिडिओ करणाऱ्या या तरुणाचं मी कौतुक करते. मी आणि माझ्या टीमने मिळून या तरुणाला शोधून काढलं. आमच्यासोबत काही व्हिडिओ शूट करण्यास त्याने होकार दिला,’ असं तिने सांगितलं.

IPL 2024 Punjab Kings vs Mumbai Indians Match Updates in Marathi
IPL 2024: डगआऊटमधून रिव्ह्यूसाठी सूचना; टीम डेव्हिडचं ‘ब्रेनफेड मोमेंट’, पाहा VIDEO
a Man falls down from e rickshaw while dance atop vehicle
Video : चालत्या ई – रिक्षाच्या छतावर डान्स करत होता तरुण, क्षणात होत्याचं नव्हतं झालं; पाहा, व्हायरल व्हिडीओ
Zomato account suspension leaves delivery agent in tears on eve of sister’s wedding
बहिणीच्या लग्नाआधीच बंद झालं डिलिव्हरी बॉयचं खातं; ढसा ढसा रडणाऱ्या व्यक्तीचा व्हिडीओ पाहून झोमटोने दिले उत्तर
Viral Video of Mother's Phone Addiction
बापरे! मोबाईलच्या नादात महिलेने चिमुकल्याला फ्रिजमध्ये ठेवले? व्हायरल व्हिडीओ पाहून येईल अंगावर काटा

‘रईस’मधील ‘लैला’, दलेर मेहंदी यांच्या ‘बोलो तारा रारा’ आणि ‘तनू वेड्स मनू’मधील ‘साड्डी गल्ली’ या गाण्यांवर सनीने टिकटॉक व्हिडिओ केले आहेत. या व्हिडिओमध्ये पती डॅनिअल वेबरनेही सनीला साथ दिली आहे.