शाळेत पहिल्यांदा किस करताना वडिलांनी पाहिलं अन्.. सनीने शेअर केला भयानक अनुभव

एका मुलाखतीमध्ये तिने हा खुलासा केला

बॉलिवूड अभिनेत्री सनी लियोनी सतत कोणता ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. ती नेहमीच बिनधास्तपणे तिच्या खासगी आयुष्याविषयी बोलताना दिसते. काही दिवसांपूर्वी तिची ‘करनजीत कौर द अनटोल्ड स्टोरी’ ही वेब सीरिज प्रदर्शित झाली होती. या सीरिजच्या प्रमोशनच्या वेळी सनीने फर्स्ट किस करतानाचा अनुभव सांगितला होता.

या मुलाखतीमध्ये तिनी तिच्या संपूर्ण आयुष्यातील अनेक गोष्टींचा खुलासा केला. त्यावेळी तिने पहिल्यांदा किस केल्याचा भयानक अनुभव सांगितला. सनीने शाळेत असताना पहिल्यांदा किस केले होते आणि तिच्या वडिलांनी तिला किस करताना पाहिले होते. त्यानंतर सनीला तिच्या वडिलांनी घरी आल्यावर चांगलेच सुनावले होते.

View this post on Instagram

#StayHome #StayBeautiful #StaySafe

A post shared by Sunny Leone (@sunnyleone) on

‘जेव्हा मी पहिल्यांदा किस केले तेव्हा शाळेत होते. माझ्या बॉयफ्रेंडला मी किस करत होते आणि तेवढ्यात मला वडिलांनी पाहिले. त्यानंतर मी घरी गेल्यावर त्यांनी मला खूप सुनावले’ असे तिने या मुलाखतीमध्ये म्हटले होते.

सनी सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असल्याचे पाहायला मिळते. ती तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर सतत व्हिडीओ आणि फोटो शेअर करताना दिसते. काही दिवसांपूर्वी सनीने तिच्या लव लाईफ बद्दल देखील खुलासा केला होता. सनीचा पती डॅनियल वेबरने सनीला लेस्बियन समजले होते. कारण त्याने सनीला पाहिले होते तेव्हा तिच्यासोबत असणारी तिची मैत्रीण लेस्बियन होती. सनी आणि डॅनियने दोन वर्ष एकमेकांना डेट केले होते. त्यानंतर त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला. २०११मध्ये दोघेही लग्न बंधनात अडकले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Sunny leone share her first kiss experience avb

Next Story
गॉसिप
ताज्या बातम्या