करिना घेणार सनीची मुलाखत?

यापूर्वी सनी आणि करिना कधीही एकत्र आल्या नव्हत्या त्यामुळे या दोघींच्या चाहत्यांसाठी हा वेगळा अनुभव ठरणार आहे हे नक्की.

करिना कपूर

करिना कपूर खान चक्क आर.जे. म्हणजेच रेडिओ जॉकीच्या भूमिकेत दिसणार आहे. करिना लवकरच तिचा स्वत:चा रेडिओ चॅट शो घेऊन चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. तिच्या पहिल्या वहिल्या चॅट शोच्या पहिल्याच भागात सेलिब्रेटी गेस्ट कोण असेल याचंच कुतूहल अनेकांना होतं. मात्र पहिल्या चॅट शोसाठी करिनानं चक्क सनी लिओनीला आमंत्रित केलं आहे. नुकतंच करिनानं आपल्या पहिल्या रेडिओ चॅट शोचं चित्रिकरण पार पाडलं. यापूर्वी सनी आणि करिना कधीही एकत्र आल्या नव्हत्या त्यामुळे या दोघींच्या चाहत्यांसाठी हा वेगळा अनुभव ठरणार आहे हे नक्की.

करिना कपूर आणि सनीचा चॅट शोमधला फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. त्यातूनही करिना कपूर आर.जेची जबाबदारी कशी पार पडते हे पाहणं तिच्या चाहत्यांसाठी औत्सुक्याचं ठरणार आहे. करिनाचा रेडिओ शो येत्या डिसेंबरपासून सुरू होणार असल्याचं म्हटलं जातं आहे. सध्या निर्माता दिग्दर्शक करण जोहरचा ‘कॉफी विथ करण’, ‘कॉलिंग करण’, नेहा धुपियाचा ‘नो फिल्टर नेहा’ हे चॅट शोही तरुणाईमध्ये विशेष प्रसिद्ध आहेत त्यामुळे करिनाच्या चॅट शोमध्ये काय नवं पाहायला मिळणार याची उत्सुकता अनेकांना आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Sunny leone to be kareena kapoor first guest in her new radio chat show

ताज्या बातम्या