सुपर डान्सरमध्ये शिल्पाच्या ऐवजी परीक्षक म्हणून दिसणार रितेश-जेनेलिया!

रितेश आणि जेनेलिया दिसणार ‘सुपर डान्सर चॅप्टर ४’च्या आगामी एपिसोडमध्ये…

riteish deshmukh, genelia dsouza, shilpa shetty, raj kundra
रितेश आणि जेनेलिया दिसणार 'सुपर डान्सर चॅप्टर ४'च्या आगामी एपिसोडमध्ये…

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी पती राज कुंद्राला अटक झाल्यापासून ‘सुपर डान्सर चॅप्टर ४ ‘या डान्स रिअॅलिटी शोमध्ये दिलसी नाही. शिल्पाच्या जागी प्रत्येक भागात कोणी पाहुणा कलाकार येऊन हजेरी लावतो. गेल्या एपिसोडमध्ये अभिनत्री करिश्मा कपूरने हजेरी लावली होती. तर आगामी एपिसोडमध्ये बॉलिवूडमधील लोकप्रिय जोडी रितेश देशमुख आणि जेनेलिया हजेरी लावणार आहेत.

या वेळी गीता कपूर आणि अनुराग बासूसोबत परिक्षक म्हणून रितेश आणि जेनेलिया दिसणार आहेत. संबंधित सुत्रांनी ‘नवभारत टाइम्स’ला दिलेल्या वृत्तानुसार, रितेश आणि जेनेलिया यांना निर्मात्यांनी शोसाठी विचारले होते. एवढंच नाही तर निर्मात्यांनी विचारताच रितेश आणि जेनेलियाने होकार दिला आहे. त्या दोघांना हा शो प्रचंड आवडत असल्याचे सांगत त्यांनी लगेच होकार दिला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Riteish Deshmukh (@riteishd)

आणखी वाचा : ‘बाबा!!! आई आली’, रितेश- जेनेलियाचा मजेशीर व्हिडीओ व्हायरल

रितेश आणि जेनेलियाचे विनोदी व्हिडीओ नेहमीच सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात. आता ते दोघेही या शोमध्ये हजेरी लावणार म्हटल्यावर प्रेक्षकांना त्या दोघांची स्पर्धकांसोबत असलेली मस्ती पाहता येणार आहे.

आणखी वाचा : ‘मी घाबरलो होतो’; नागा चैतन्यने सांगितला समंथासोबतच्या पहिल्या ‘KISS’चा किस्सा

तर राज कुंद्राच्या अटकेनंतर शिल्पा घरातून बाहेर पडली नाही. गेल्या काही दिवसांपासून तिचे निर्मात्यांशी काही बोलणे नाही झाले आणि त्यामुळे ते पाहुण्यांना परिक्षक म्हणून बोलवत असल्याचे सांगण्यात येत आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Super dancer chapter 4 riteish deshmukh and genelia dsouza will replace shilpa shetty dcp