मागच्यावर्षी पासून दाक्षिणात्य चित्रपटांची भुरळ आता देशभरातील प्रेक्षकांना पडली आहे. ‘पुष्पा’, ‘केजीएफ २’, ‘कांतारा’नंतर सध्या एका चित्रपटाची हवा आहे तो चित्रपट म्हणजे ‘दसरा’. तेलगू सुपरस्टार नानी या चित्रपटातून मुख्य भूमिकेत दिसत आहे. या चित्रपटाबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे.

काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला होता. अनेकांना हा चित्रपट पुष्पासारखा वाटला. छोट्याश्या गावातील एक मुलगा त्याच्या लोकांसाठी संघर्ष करताना दिसला आहे. टीझरमध्ये दमदार डायलॉग आहेत. हा चित्रपट ३० मार्च रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे मात्र आधीच या चित्रपटाची तिकिटे विकली गेली आहेत. विशेष म्हणजे प्रेक्षक शो वाढण्यासाठी मागणी करत आहेत. त्यामुळे निर्मात्यांनी आता पहिला शो सकाळी ५ वाजता ठेवला असून शेवटचा शो मध्यरात्री ठेवला आहे.

documentary on mangroves of maharashtra
आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले : पावलोपावली नवशिक्षण
Cyber cheater arrested from Madhya Pradesh who cheat music director
संगीत दिग्दर्शकाची सायबर फसवणूक करणाऱ्याला मध्य प्रदेशातून अटक, सायबर पोलिसांची कारवाई
The Kerala Story screening in church
‘लव्ह जिहाद’चं कारण देत विद्यार्थ्यांना दाखवला ‘द केरला स्टोरी’ चित्रपट; केरळच्या चर्चमधला प्रकार!
Percival Everett is an American writer American fiction cinema Oscar
बुकबातमी: भटकबहाद्दराची मिसिसिपी मुशाफिरीच, पण भिन्न नजरेतून..

“मला तिने रात्री…” प्रसिद्ध अभिनेते, भाजपा खासदार रवी किशन यांचा कास्टिंग काऊचबाबत धक्कादायक खुलासा

हा चित्रपट तेलंगणा व आंध्र प्रदेश या राज्यांमध्ये एकूण १३०० स्क्रीन्सवर दाखवण्यात येणार आहे. हा चित्रपट पहिल्याच दिवसापासून धमाका करणार अशी शक्यता वर्तवली जात आहे. तेलुगूच्या बरोबरीने हा चित्रपट तामिळ, कन्नड, मल्याळम आणि हिंदी भाषेत प्रदर्शित होणार आहे. विशेष म्हणजे अजय देवगणचा ‘भोला’ हा चित्रपटदेखील त्या दिवशी प्रदर्शित होणार आहे.

दरम्यान ‘दसरा’ चित्रपटाचे दिग्दर्शन श्रीकांत ओडेला यांनी केलं असून नानीच्या बरोबरीने कीर्ती सुरेश, संतोष नारायण हे अभिनेतेदेखील दिसणार आहेत. नानीच्या करियरमधला सर्वात हिट चित्रपट हा ठरू शकतो.