scorecardresearch

रजनीकांत यांनी निर्माण केली दहशत, ‘जेलर’ चित्रपटातील लूक आउट

या चित्रपटातील रजनीकांत यांचा लूक आउट करण्यात आला आहे. नेहमीप्रमाणे यावेळीही रजनीकांत यांनी या नव्या लूकमध्ये प्रेक्षक वर्गात दहशत निर्माण केली आहे.

रजनीकांत यांनी निर्माण केली दहशत, ‘जेलर’ चित्रपटातील लूक आउट

दिग्दर्शक नेल्सन दिलीप कुमार यांच्या जेलर या चित्रपटामुळे रजनीकांत सध्या चर्चेत आहेत. त्यांचे चाहते खूप दिवसांपासून या चित्रपटाची वाट पाहत आहेत. ‘जेलर’चे निर्माते चित्रपटाबद्दल सतत नवनवीन अपडेट्स देत आहेत. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात झाली आणि आता लगेच या चित्रपटातील रजनीकांत यांचा लूक आउट करण्यात आला आहे. नेहमीप्रमाणे यावेळीही रजनीकांत यांनी या नव्या लूकमध्ये प्रेक्षक वर्गात दहशत निर्माण केली आहे.

आणखी वाचा : अभिनेता पंकज त्रिपाठीची कौतुकास्पद कामगिरी, लावला पर्यावरणाच्या संरक्षणासाठी हातभार

या फोटोमध्ये ते अत्यंत गंभीर दिसत आहेत. चित्रपटाचे शूटिंग १५ ऑगस्ट किंवा २२ ऑगस्टपासून सुरू होणार असल्याची चर्चा अनेक दिवसांपासून सुरू होती, जी आता स्पष्ट झाली आहे. रजनीकांत यांचे पोस्टर शेअर करताना आजपासून चित्रपटाचे शूटिंग सुरू झाले आहे असेही निर्मात्यांनी सांगितले. या बातमीनंतर रजनीकांत यांचे चाहते या चित्रपटाबद्दल खूप उत्सुक असलेले दिसत आहेत.

या चित्रपटात रजनीकांतसोबत अभिनेत्री तमन्ना भाटिया महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. तमन्नाची रजनीकांत यांच्याबरोबर स्क्रीन शेअर करण्याची ही पहिलीच वेळ आहे. मात्र, या चित्रपटाचे निर्माते आणि तमन्नाने याबाबत अद्याप कोणतेही अधिकृत वक्तव्य केलेले नाही. या चित्रपटासाठी निर्माते भव्य सेट तयार करण्याच्या तयारीत असल्याचेही बोलले जात आहे.

हेही वाचा : सुपरस्टार रजनीकांत राजकारणात पुन्हा सक्रीय होणार? राज्यपालांच्या भेटीनंतर चर्चांना उधाण

रजनीकांत यांचा हा १६९ वा फीचर चित्रपट आहे. यात ऐश्वर्या राय बच्चन देखील दिसणार आहे. यासोबतच शिवकार्तिकेयन, प्रियांका अरुल मोहन, रम्या कृष्णन हे देखील चित्रपटात दिसणार आहेत. रजनीकांत यांचे तिचे सीन बेंगळुरू आणि म्हैसूरमध्ये शूट होणार असल्याचेही सांगण्यात येत आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

ताज्या बातम्या