‘किंग खान’, ‘बाजीगर’, ‘किंग ऑफ रोमॅन्स’ अशा विविध नावाने बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानला ओळखले जाते. भारतासह परदेशातही शाहरुखचा तुफान चाहतावर्ग आहे. तो नेहमीच काही ना काही कारणांमुळे चर्चेत असतो. मात्र सध्या तो एका वेगळ्याच प्रकरणामुळे चर्चेत आला आहे. शाहरुख खानला पाच वर्षांपूर्वी एका जुन्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. त्यामुळे त्याच्या चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे.

२०१७ मध्ये शाहरुख खानचा रईस चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाचे प्रमोशन करताना वडोदरा रेल्वे स्टेशनवर चेंगराचेंगरी झाल्याचा प्रकार समोर आला होता. या प्रकरणी शाहरुख खानवर फौजदारी खटला दाखल करण्यात आला होता. मात्र आता या प्रकरणातील गुन्हा मागे घेण्यात आला आहे.
आणखी वाचा : “माझ्याशी वैर घ्यायचं नसतं वाघोबा…” सुमीत राघवन आणि अमेय वाघमध्ये वादाची ठिणगी; जाणून घ्या प्रकरण काय?

Patna High court
मुलांसाठी पत्नीच्या पालकांकडून पैसे मागणे हा हुंड्याचा प्रकार नाही; उच्च न्यायालयाचा पतीला दिलासा
kejriwal arrest
न्यायालयांचा केजरीवाल यांना पुन्हा धक्का; तातडीने सुनावणी घेण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार ?
chief justice dy chandrachud
‘मी व्हिस्कीचा चाहता’, सर्वोच्च न्यायालयात वकिलांनी असं म्हटल्यावर सरन्यायाधीश चंद्रचूड म्हणाले…
supreme court on ED
‘आरोपींना खटल्याशिवाय डांबून ठेवणं चुकीचं’, सर्वोच्च न्यायालयाची आता ईडीला चपराक

नेमकं प्रकरण काय?

शाहरुख खान २०१७ मध्ये त्याच्या रईस चित्रपटाच्या प्रमोशनसाठी दिल्लीहून मुंबई रेल्वे प्रवास करत होता. यावेळी ज्या ज्या रेल्वे स्टेशनवर ट्रेन थांबली त्या त्या ठिकाणी त्याने चित्रपटाचे प्रमोशन केले. या प्रवासादरम्यान गुजरातमधील वडोदरा येथे पण ही ट्रेन थांबली. यावेळी शाहरुखची एक झलक पाहण्यासाठी तेथे गर्दी जमली. त्यावेळी तिथे चेंगराचेंगरीची परिस्थिती निर्माण झाली होती. यावेळी फरीद खान नावाच्या एका स्थानिकाला आपला जीव गमवावा लागला. यामध्ये काही जण जखमीही झाले आहेत.

या घटनेनंतर काँग्रेस नेते जितेंद्र सोळंकी यांनी स्थानिक न्यायालयात तक्रार दाखल केली होती. जितेंद्र सोळंकी यांनी वडोदरा कोर्टात तक्रार दाखल केली होती. शाहरुख खानने चित्रपटाचे नाव असलेला टी-शर्ट आणि प्रमोशनल साहित्य स्थानिक जमावाच्या दिशेने फेकले गेले. त्यामुळे हा अपघात झाला, असा दावा त्यांनी केला होता.

यानंतर वडोदरा कोर्टाने शाहरुखच्या विरोधात समन्स जारी केला होता. या समन्सला शाहरुख खानने गुजरात उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. त्यानंतर या वर्षी एप्रिलमध्ये गुजरात उच्च न्यायालयाने हे प्रकरण रद्द केले होते. आता सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाचा हा निर्णय कायम ठेवला आहे. त्यामुळे शाहरुखला दिलासा मिळाला आहे.

आणखी वाचा : “एखादी जाडी बाई…” विशाखा सुभेदारने व्यक्त केली खंत

दरम्यान शाहरुख खान हा लवकरच ‘पठाण’या चित्रपटात झळकणार आहे. हा चित्रपट हिंदी, तमिळ आणि तेलुगू या भाषेत प्रदर्शित होणार आहे. येत्या २५ जानेवारी २०२३ रोजी हा चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.