पाहा सुव्रत- सखीचं काय आहे नवं कपल गोल

सखीने शेअर केलेल्या फोटोंवरुन या चर्चा सुरु आहेत

छोट्या पडद्यावरील सुपरहिट ठरलेली मालिका म्हणजे ‘दिल दोस्ती दुनियादारी.’ या मालिकेतील अभिनेत्री सखी गोखले आणि अभिनेता सुव्रत जोशी काही दिवसांपूर्वी लग्नबंधनात अडकले. सध्या सखी लंडनमध्ये उच्च शिक्षण घेण्यासाठी गेली आहे. त्यामुळे ते दोघे सध्या लॉंग डिस्टंट रिलेशनशीपमध्ये असल्याचे म्हटले जात आहे. पण नुकताच सखीने शेअर केलेल्या फोटोची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु आहे.

नुकताच सखीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर सुव्रतसोबतचा फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये दोघांनीही सेम टॅटू काढला आहे. नक्षत्र, दिवस-रात्र, जग याचं प्रतिक असणारा हा टॅटू आहे. एका मुलाखतीमध्ये सखीने तिला टॅटूची आवड असल्याचे सांगितले होते. तिने यापूर्वी तीन टॅटू काढले असून हा चौथा टॅटू आहे.

सखी आणि सुव्रतने एप्रिल 2019मध्ये लग्न केले. मोजक्या मित्रमंडळींच्या उपस्थितीत नेरळ येथील फार्महाऊसवर हा विवाहसोहळा पार पडला. या विवाहसोहळ्यात सखीने हिरव्या रंगाची पैठणी, नथ, कोल्हापुरी साज, पाटल्या असा अस्सल मराठमोळा पेहराव केला होता. तर सुव्रतनं कुरता, शाल आणि टोपी असा पेहराव केला होता. या सोहळ्याला अभिनेता जितेंद्र जोशी, चिन्मयी सुमित, सुमित राघवन, अमर फोटो स्टुडिओची सगळी टीम, आरती वडगबाळकर, रेशम प्रशांत, सायली संजीव, पर्ण पेठे, अमेय वाघ, निपुण धर्माधिकारी आणि सुनील बर्वे यांनी हजेरी लावली होती.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Surat and sakhi gokhle couple goals avb