अभिनेत्री सुरभि तिवारीने पतीपासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे. सुरभिने २०१९ मध्ये दिल्लीत स्थित असलेल्या पायलट आणि व्यावसायिक प्रवीण कुमार सिन्हा यांच्याशी लग्न केले. लग्नानंतर अशा अनेक गोष्टी घडल्या ज्यामुळे पतीपासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे. सुरभिने सांगितलं की फक्त तिचा पती नाही तर सासू, नणंदने देखील प्रचंड त्रास दिला आहे. यानंतर तिने पती आणि त्याच्या कुटुंबासोबत राहायचे नसल्याचे म्हटले आहे. याविषयी सुरभिने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत या विषयी सांगितले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आणखी वाचा : अर्जुन कपूरची बहिण अंशुलाने कॅमेऱ्यासमोर काढून दाखवली ब्रा; प्रियांका चोप्रा, म्हणाली…

सुरभिनं पती आणि त्याच्या कुटुंबावर कौटुंबिक अत्याचाराचे आणि धमकावल्याचे आरोप केले आहेत. वर्सोवा पोलिस ठाण्यात २० जून रोजी ही तक्रार दाखल केली आहे. यासोबतच १२ मे रोजी अंधेरीच्या मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट कोर्टात कौटुंबिक अत्याचाराचा गुन्हा देखील दाखल केला होता.

आणखी वाचा : विमानतळावर दिसले करण जोहरच्या मुलांचे संस्कार, पाहा व्हिडीओ

सुरभिने ‘आजतक’ला दिलेल्या मुलाखतीत या विषयी सांगितले आहे. प्रवीण माझ्यासोबत सुरुवातीला मुंबईला येण्यासाठी तयार होते, परंतु त्यानंतर त्यांनी आपली ट्रान्सफर करुन घेण्यासाठी नकार दिला. मला माझं अभिनयक्षेत्रातलं करिअर सुरू ठेवायचं होतं, पण मी मालिका करु शकत नव्हते कारण मी पतीसोबत दिल्लीत राहत होते. यामुळे मी आर्थिकदृष्ट्या पूर्णपणे माझ्या पतीवर अवलंबून होते. याव्यतिरिक्त, मला आई व्हायचं होतं, पण त्यासाठी देखील माझा पती तयार नव्हता.”

आणखी वाचा : “कारशेड आरेतच होणार…”, सुमीत राघवनचा राज्य सरकारच्या निर्णयाला पाठिंबा

पुढे सुरभि म्हणाली, “मी प्रवीण, त्याची आई, बहिणी विरोधात तक्रार दाखल केली आहे. मला माझे दागिने परत हवे आहेत, ज्यांच्यावर माझा हक्क आहे. लग्नात माझ्या पतीला आणि मला माझ्या माहेरहून सोन्याच्या दागिन्यांसोबत काही चांदीची भांडी, वस्तू देखील देण्यात आली होती. पण मला ते घर सोडताना काहीच देण्यात आलेलं नाही. माझ्याकडे पैसे असते तर मला जिवंत राहण्यासाठी आणि माझ्या औषधोपचाराच्या खर्चासाठी दागिने विकायची वेळ आली नसती, म्हणून मला माझे दागिने परत हवे आहेत.”

आणखी वाचा : “टरबूज हे आरोग्यासाठी चांगले… पण शिंदे”; ‘बिग बॉस’ फेम पराग कान्हरेच्या ‘या’ पोस्टपेक्षा नेटकऱ्यांच्या कमेंट चर्चेत

सुरभि पुढे म्हणाली, “मी लठ्ठ आहे, प्रवीणच्या आई तर माझ्या खाण्यापिण्यावर लक्ष ठेवायची की मी काय खाते. घरी येणाऱ्या नातेवाइकांनी सांगितले की, ती लठ्ठ आहे, त्यामुळे ती आम्हाला मुल देऊ शकत नाहीत. दुसरीकडे, प्रवीणच्या आईने त्याला, माझ्यापासून दूर राहण्याचा सल्ला द्यायची, जेणेकरून घरात कोणीही वारस येऊ नये, कारण मग त्याला वाटा द्यावा लागेल.”

आणखी वाचा : ‘ठाण्याचे बाळासाहेब ठाकरे’ अशी ओळख असणाऱ्या आनंद दिघेंबद्दलच्या या गोष्टी माहित आहे का?

रिपोर्टनुसार सुरभि म्हणाली, “त्यांनी केलेल्या या हिंसाचारामुळे ती इतकी अस्वस्थ झाली होती की ती आत्महत्या करायला निघाली होती, पण तिच्या मैत्रिणींनी तिला ही लढाई लढण्यासाठी खूप प्रोत्साहन दिले. जेव्हा प्रवीणने सुरभिचा खर्च उचलण्यास नकार दिला तेव्हा तिच्या मैत्रिणींनी पैसे जमा करून तिला मदत केली.”

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Surbhi tiwari accuses husband of domestic violence says had suicidal thoughts dcp
First published on: 04-07-2022 at 16:43 IST