‘जय भीम’ची रिअल लाइफ प्रेरणास्थान असणाऱ्या महिलेला सुर्याने केली १० लाखांची मदत

तामिळ सुपरस्टार सूर्याची प्रमुख भूमिका असलेला ‘जय भीम’ चित्रपट सध्या देशभरात चर्चेचा विषय ठरलाय.

suriya, jai bhim,
तामिळ सुपरस्टार सूर्याची प्रमुख भूमिका असलेला ‘जय भीम’ चित्रपट सध्या देशभरात चर्चेचा विषय ठरलाय.

तामिळ सुपरस्टार सूर्याचा ‘जम भीम’ हा चित्रपट २ नोव्हेंबर रोजी अॅमेझॉन प्राईम या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला होता. सुर्या आणि ज्योतिका यांच्या होम प्रोडक्शन बॅनरने सोमवारी म्हणजेच १४ नोव्हेंबर रोजी घोषणा केली की सुर्या पार्वती अम्मल यांच्या नावावर १० लाख रुपयांची फिक्स डिपॉजीट करणार आहे. कारण त्यांच्या जीवनकथेवरून जय भीम या चित्रपटेच्या कथेला प्रेरणा मिळाळी आहे. पार्वती अम्मल यांचे पती राजकन्नू हे पोलिस कोठडीत असताना त्यांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर पार्वती यांनी न्यान मागितला होता.

सुर्याने १० लाख रुपये फिक्स डिपॉझिट केले आहेत. त्यातून मिळणारे व्याज हे दर महिन्याला पार्वती यांना दिले जाईल. त्यांच्या मृत्यूनंतर फिक्स डिपॉझिटची रक्कम ही त्यांच्या मुलांना दिली जाईल, असे वृत्त द हिंदूने दिले आहे.

आणखी वाचा : KBC 13 : उंच आहात तर घरातील पंखे तुम्ही साफ करता का? एका लहान मुलाने विचारलेल्या प्रश्नाचे बिग बींनी दिले भन्नाट उत्तर

आणखी वाचा : माझे पणजोबा स्वातंत्र्यसैनिक होते, त्यामुळेच मला…; कंगनाचा जुना व्हिडीओ व्हायरल

या चित्रपटाचे दिग्दर्शन टीजे ज्ञानवेल यांनी केले आहे. या चित्रपटात प्रकाश राज, राजिशा विजयन, मणिकंजन राव रमेश आणि लिजो मोल जोस मुख्य भूमिकेत आहेत. सत्य घटनांवर आधारित या चित्रपटाच्या कथानकापासून अभिनय, दिग्दर्शनापर्यंत सर्वच गोष्टींचं कौतुक होतंय. एका विशिष्ट आदिवासी समुहावर आधारित हा चित्रपट प्रेक्षकांच्या चांगलाच पसंतीला उतरला आहे. सर्वसामान्यांपासून सेलिब्रेटींपर्यंत अनेकजण यावर प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. याशिवाय आयएमडीबीवरही या चित्रपटाला भारतीय श्रेणीत सर्वाधिक रेटिंग मिळालं आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Suriya donates 10 lakhs to parvati ammal in fix deposit because she is the real inspiration of jai bhim dcp