scorecardresearch

‘बाजीराव-मस्तानी’ ‘या’ ठिकाणी आहेत सिक्रेट हॉलिडेवर

व्हिडिओमध्ये दोघही कूल अंदाजात दिसत आहेत.

‘बाजीराव-मस्तानी’ ‘या’ ठिकाणी आहेत सिक्रेट हॉलिडेवर
रणवीर सिंग, दीपिका पदुकोण, ranveer, deepika

सध्याच्या घडीला बी- टाऊनमध्ये बऱ्याच सेलिब्रिटींचे रिलेशनशिप चर्चेत आहेत. त्यापैकीच एक जोडी म्हणजे अभिनेता रणवीर सिंग आणि अभिनेत्री दीपिका पदुकोण. रणवीर आणि दीपिका यंदाच्या वर्षी विवाहबंधनात अडकणार असल्याचं या वर्षाच्या सुरुवातीपासूनच म्हटलं जात होतं. त्यामुळे सध्या बॉलिवूडची ही जोडी लग्नाच्या तयारीला लागली असून या काळातही ते एकमेकांना वेळ देताना दिसत आहे.

दिपिका पदुकोण आणि रणवीर सिंह सध्या फ्लोरिडामध्ये त्यांचा क्वालिटी टाईम्स घालवत असून नुकताच त्यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओवरुन ते डिज्नीलॅड फिरताना दिसत आहेत. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये दोघही कूल अंदाजात दिसत असून दीपिकाची बहीण अनीशाही असल्याचं पाहायला मिळत आहे.

ही सिक्रेड हॉलिडेवर असल्याचं सांगण्यात येत आहे. विशेष म्हणजे व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमुळे ते हॉलिडेवर गेल्याचं समोर आलं आहे. त्यातच सध्या हे दोघं फ्लोरिडामध्ये मौजमस्ती करत असून या व्हिडिओमध्ये त्यांनी एकमेकांचा हात धरल्याचं दिसून येत आहे. लवकरच या दोघांची लग्नगाठ बांधणार असून त्यांनी डेस्टीनेशन वेडिंगला प्राधान्य दिल्याचं सांगण्यात येत आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

ताज्या बातम्या