सुर्यग्रहणाच्या प्रकोपापासून वाचण्यासाठी दूरदर्शनने दाखवलेला ‘हा’ चित्रपट

२६ फेब्रुवारी १९८० रोजी सूर्यग्रहणचा दिवस होता

Surya Grahan 2019: यंदाच्या वर्षातील शेवटचे सूर्यग्रहण आज म्हणजे २६ डिसेंबर रोजी होत आहे. भारतीय वेळेनुसार हे ग्रहण सकाळी ८ वाजल्यापासून सुरु होणार आहे. १० वाजून ४८ मिनिटांनी ग्रहणाचा मध्य असेल. तर दुपारी १ वाजून ३६ मिनिटांनी ग्रहण मोक्ष होणार आहे. पृथ्वीच्या पूर्व गोलार्धातून ते दिसणार आहे. विशेष म्हणजे भारतामधील अनेक शहरांमधून हे ग्रहण पाहता येणार आहे. या ग्रहणादरम्यान ‘रिंग ऑफ फायर’ म्हणजेच कंकणाकृती सूर्यग्रहणाचे विलोभनीय दृश्य पाहण्याची संधी मिळणार आहे. पण एकेकाळी सूर्य ग्रहणाच्या प्रकोपापासून लोकांना वाचवण्यासाठी चित्रपट दाखवण्यात आला असल्याचे म्हटले जाते.

२६ फेब्रुवारी १९८० रोजी सूर्यग्रहणाचा दिवस होता. लोकांनी सुरक्षेशिवाय सूर्यग्रहण पाहू नये असे सरकारने सांगितले होते. कारण सूर्याच्या थेट किरणांचा पाहणाऱ्याच्या डोळ्यांवर परिणाम होणार होता. यापासून लोकांचे रक्षण करण्यासाठी सरकारने त्यावेळी दूरदर्शनवर हृषिकेश मुखर्जी दिग्दर्शित ‘चुपके चुपके’ हा चित्रपट टेलिकास्ट केला होता. हा एक कॉमेडी चित्रपट असून अभिनेते धर्मेंद्र, अमिताभ बच्चन, ओम प्रकाश, जया बच्चन, शर्मिला टागोर हे कलाकार झळकले होते.

‘चुपके चुपके’ या कॉमेडी चित्रपटाने त्यावेळी बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली होती आणि सूर्यग्रहणाच्या वेळी हा चित्रपट दूरदर्शनवर टेलिकास्ट करण्यात आला होता. चित्रपट पाहण्यासाठी अनेक लोक घरात थांबतील या हेतूने हा चित्रपट दाखवण्यात आला होता.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Surya grahan 2019 in 1980 to protect people from solar eclipse chupke chupke movies telecast on tv avb

ताज्या बातम्या