जेव्हा सुशांतच्या प्रश्नांमुळे वैतागलेला धोनी, कॅप्टन कूलनं सांगितला किस्सा

क्रिकेटर महेंद्रसिंह धोनीनं अभिनेता सुशांतसिंह राजपूतची एक आठवण शेअर केली होती.

sushant singh rajput, sushant singh rajput birth anniversary, mahendra singh dhoni, m s dhoni the untold story, सुशांत सिंह राजपूत, महेंद्रसिंह धोनी, सुशांत सिंह राजपूत वाढदिवस
सुशांतसिंह राजपूतनं कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीच्या बायोपिकमध्ये मुख्य भूमिका साकारली होती.

अभिनेता सुशांतसिंह राजपूतनं दमदार अभिनयाच्या जोरावर बॉलिवूडमध्ये आपलं वेगळं स्थान निर्माण केलं होतं. पण वयाच्या अवघ्या ३४ व्या वर्षी सुशांतनं या जगाचा निरोप घेतला. सुशांतच्या आत्महत्येनंतर सर्वांनाच मोठा धक्का बसला होता. सुशांतचा आज जन्मदिवस. बिहारमध्ये जन्मलेल्या सुशांतची एक आठवण कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीनं शेअर केली होती. हा किस्सा त्या वेळीचा आहे जेव्हा सुशांत, धोनीचा बायोपिक ‘एम एस धोनी : द अनटोल्ड स्टोरी’ची तयारी करत होता.

सुशांतसिंह राजपूतनं कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीच्या बायोपिकमध्ये मुख्य भूमिका साकारली होती. पण जेव्हा तो या चित्रपटाची तयारी करत होता. त्यावेळी धोनी त्याला वैतागला होता. चित्रपट प्रमोशनच्या वेळी धोनीनं सुशांतचा हा किस्सा शेअर केला होता. सुशांत या चित्रपटाच्या तयारीसाठी धोनीला ३ वेळा भेटला होता. धोनीनं सांगितलं जेव्हा सुशांत त्याला पहिल्यांदा भेटला तेव्हा सुशांत खूप शांत होता. पण जेव्हा धोनी आणि सुशांत पुन्हा भेटले तेव्हा मात्र सुशांत एका मागोमाग एक प्रश्न विचारून हैराण केलं होतं. सुशांतच्या प्रश्नांमुळे धोनी अक्षरशः वैतागला होता.

टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत धोनी म्हणाला होता, ‘दुसऱ्या भेटीच्या वेळी सुशांत एका मागोमाग एक प्रश्न विचारत होता. ज्याची उत्तरं देऊन मी थकलो होतो. तो मला सारखा फॉलो करत होता. मी जिथे जाईन तिथे माझ्या मागे येत असे. मी त्याला एकदा बोललो देखील की तू खूप प्रश्न विचारतोस. पण मला त्याचं फार कौतुक वाटलं. आपल्या कामाप्रती तो खूप प्रामाणिक होता.’

सुशांतनं १४ जून २०२० रोजी मुंबईतील त्याच्या राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली होती. सुशांतच्या आत्महत्येवर बरेच प्रश्न उपस्थित केले गेले होते. एवढंच नाही तर बॉलिवूडमधील घराणेशाहीचा मुद्दा देखील त्यावेळी बराच चर्चेत आला होता. याशिवाय त्याच्या कुटुंबीयांनी आणि चाहत्यांनीही त्याच्या आत्महत्येवर संशय व्यक्त केला होता.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Sushant singh rajput birth anniversary m s dhoni shared memories said his questions had exhausted mrj

Next Story
‘गहराइयां’मध्ये इंटिमेट सीन शूट करण्याविषयी दीपिका म्हणते…
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी